DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास भेट; महागाई भत्त्यातील वाढीसह महिल्यांच्या खात्यात येणार ‘इतके’ रुपये

या निर्णयामुळे आता राज्यातील महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून वाढून 60 टक्क्यांवर पोहोचणार आहे. ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली जाईल.<br/>

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास भेट; महागाई भत्त्यातील वाढीसह महिल्यांच्या खात्यात येणार ‘इतके’ रुपये

DA Hike: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी गुरुवारी राज्यातील सरकारी कर्मचारी आणि महिलांसाठी दिलासादायक घोषणा केली आहे. 'थलपती विजय' यांनी सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या महागाई भत्त्यात (DA) 2 टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. या निर्णयामुळे आता राज्यातील महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून वाढून 60 टक्क्यांवर पोहोचणार आहे. ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली जाईल.

तिजोरीवर पडणार 1,230 कोटींचा अतिरिक्त बोजा
महागाई भत्त्यातील या सुधारणेमुळे राज्य सरकारवर दरवर्षी सुमारे 1,230 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. सरकारच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार, सरकारी अधिकारी, शिक्षक, निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असून, यासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल.

'कलाईनार मगलीर उरिमाई थोगई' योजनेचा हप्ता जमा होणार
कर्मचाऱ्यांसोबतच मुख्यमंत्री विजय यांनी राज्यातील महिलांसाठीही महत्त्वाची घोषणा केली आहे. 'कलाईनार मगलीर उरिमाई थोगई' योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केला जाईल. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,000 ची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना राबवण्यासाठी आणि लाभार्थींच्या खात्यात पैसे वेळेवर पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत.

हेही वाचा – Raj Thackeray on NEET Paper Leak : 'NEET' लादण्याची गरज नव्हती, पण सरकारची खुमखुमी इतकी तीव्र… राज ठाकरे यांनी उपटले सरकारचे कान

निवडणूक आश्वासनांची पूर्तता आणि भविष्यातील पावले
विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीपूर्वी थलपती विजय यांच्या 'तामिझगा वेट्री कझगम' (TVK) पक्षाने 60 वर्षांखालील महिलांना दरमहा 2,500 देण्याचे आश्वासन दिले होते. सध्याच्या 1,000 च्या मदतीसोबतच भविष्यात आश्वासनानुसार ही रक्कम वाढवण्याच्या दिशेने सरकार पावले टाकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्याची ग्वाही देखील मुख्यमंत्री विजय यांनी यावेळी दिली. सत्तेत आल्यानंतर थलपती विजय यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचारी आणि महिला वर्गात आनंदाचे वातावरण असून, प्रशासकीय स्तरावर याच्या अंमलबजावणीला वेग आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number