Devendra Fadnavis: ‘पोळी भाजणारे राजकीय पक्ष अन् परीक्षेशी संबंध नसलेले लोक…’; दिल्लीतील घडामोडींवर मुख्यमंत्री फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री म्हणाले की, नियमांनुसार परवानगी घेऊन शांततेच्या मार्गाने होणाऱ्या कोणत्याही आंदोलनाला सरकारचा पूर्ण पाठिंबा राहील.

Devendra Fadnavis: ‘पोळी भाजणारे राजकीय पक्ष अन् परीक्षेशी संबंध नसलेले लोक…’; दिल्लीतील घडामोडींवर मुख्यमंत्री फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis: मुंबईत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील आंदोलनाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. आंदोलनाच्या आगोशात दडून देशामध्ये अनागोंदी माजवू पाहणाऱ्या समाजकंटकांना त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला. आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री म्हणाले की, नियमांनुसार परवानगी घेऊन शांततेच्या मार्गाने होणाऱ्या कोणत्याही आंदोलनाला सरकारचा पूर्ण पाठिंबा राहील. परंतु, मंजुरी न घेता कायदा हातात घेणे, हिंसाचार घडवणे किंवा राजकीय हेतूने अशांतता पसरवणे हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. असा प्रयत्न करणाऱ्यांवर प्रशासन कठोर पावले उचलेल.

नेतृत्वहीन आंदोलनाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न
कोणत्याही आंदोलनाला जर स्पष्ट नेतृत्व नसेल, तर स्वार्थी आणि उपद्रवी घटक त्याचा फायदा घेतात, असे सांगत फडणवीसांनी टीका केली. दिल्लीत झालेल्या निदर्शनांमध्ये अनेक राजकीय पक्ष आणि ज्यांचा त्या विषयाशी दुरान्वयेही संबंध नाही अशा संघटना केवळ स्वतःचे हित साधण्यासाठी व गोंधळाचे वातावरण निर्माण करण्यासाठी सक्रिय झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

पोलिसांनी दाखवला प्रचंड संयम  
आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली आणि दगडफेक केली. अशा स्थितीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी वेळेत पावले उचलली नसती, तर विनाकारण मोठी जीवित किंवा वित्तहानी झाली असती. सरकारला आपल्याच लोकांवर बळप्रयोग करायची अजिबात आवड नसते, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अत्यंत संयमाने योग्य तीच कारवाई केली आहे.

हेही वाचा – Sadabhau Khot On CJP Protest : "या आतंकवाद्यांना…" सदाभाऊ खोत हे काय बोलून गेले? सीजेपीच्या मोर्च्यावरील वक्तव्याने नवा वाद निर्माण?

परीक्षेशी देणेघेणे नसलेले लोक आंदोलनात घुसले
सर्वच आंदोलक वाईट असतात असा दावा मी करणार नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, काही लोक चांगल्या हेतूनेही आले असतील. मात्र, बहुतांश लोकांना मूळ मुद्द्याची किंवा परीक्षेच्या तारखांचीही माहिती नाही. जनतेने नाकारलेले काही राजकीय पक्ष आणि स्वतःचा अजेंडा राबवणारे हुल्लडबाज या आंदोलनाचा वापर आपली पोळी भाजण्यासाठी करत आहेत, हे अगदी उघड दिसत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number