Power Bill Waiver: कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यांसाठी ‘देवाभाऊ’चा सर्वात मोठा निर्णय; तब्बल 48,000 कोटींचे थकीत वीज बिल पूर्णपणे माफ

शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ केल्यानंतर, आता तब्बल 48000 कोटी रुपयांची प्रलंबित वीज बिलं पूर्णपणे माफ करण्याचा धाडसी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे.

Power Bill Waiver: कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यांसाठी ‘देवाभाऊ’चा सर्वात मोठा निर्णय; तब्बल 48,000 कोटींचे थकीत वीज बिल पूर्णपणे माफ

Power Bill Waiver: महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ केल्यानंतर, आता तब्बल 48000 कोटी रुपयांची प्रलंबित वीज बिलं पूर्णपणे माफ करण्याचा धाडसी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. शेतकऱ्यांवरील आर्थिक ओझे पूर्णपणे नष्ट करून राज्याच्या प्रगतीची नवी सुरुवात करायची आहे, याच उद्देशाने सरकारने हा मोठा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय फायद्यापेक्षा शेतकरी हिताला प्राधान्य; महायुतीच्या सहमतीने निर्णय

दरम्यान, कर्जमाफीचा निर्णय घेतल्यामुळे आयोजित एका सत्कार समारंभात बोलताना मुख्यमंत्र्यांनी यामागील पार्श्वभूमी स्पष्ट केली. ते म्हणाले की, आर्थिक शिस्तीच्या बाजूने मी नेहमीच ठाम राहिलो असलो, तरी महायुतीमधील घटक पक्षांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शेतकऱ्यांच्या हितासाठी सरसकट कर्जमाफी देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करायचे असते तर 2029 च्या निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेता आला असता; परंतु बळीराजाला संकटात ठेवून राजकारण करणे आमच्या तत्त्वात बसत नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

हेही वाचा – Supriya Sule: शरद पवार NDA सोबत जाणार? शरद पवारांच्या 'त्या' फोटोवर सुप्रिया सुळेंनी केला सर्वात मोठा खुलासा

विरोधकांच्या राजकारणावर मुख्यमंत्र्यांचा घणाघात  

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षांवर मुख्यमंत्र्यांनी यावेळी जोरदार टीका केली. विरोधक नेहमीच या प्रश्नांचे भांडवल करून स्वतःचे राजकीय हित साध्य करण्याचा प्रयत्न करत होते, असा टोला त्यांनी लगावला. हे सरकार जनतेचे आणि शेतकऱ्यांचे असून आम्ही केवळ पोकळ आश्वासने देत नाही तर ती प्रत्यक्ष कृतीत आणून दाखवतो, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number