Chitra Wagh Meet Kishori Pednekar: चित्रा वाघ यांनी घेतली किशोरी पेडणेकरांची भेट; ‘या’ कारणामुळे मानले आभार

राजकीय मतभेद बाजूला ठेवून या दोन दिग्गज महिला नेत्या एकमेकींना भेटल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Chitra Wagh Meet Kishori Pednekar: चित्रा वाघ यांनी घेतली किशोरी पेडणेकरांची भेट; ‘या’ कारणामुळे मानले आभार

Chitra Wagh Meet Kishori Pednekar:  महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांवर तुटून पडणाऱ्या भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांची नुकतीच कडकडून गळाभेट झाली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून या दोन दिग्गज महिला नेत्या एकमेकींना भेटल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. चित्रा वाघ यांनी स्वतः या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत या सदिच्छा भेटीमागचे कारण स्पष्ट केले आहे.

नारीशक्ती वंदन अधिनियमासाठी विरोध विसरल्या
या भेटीचा मुख्य उद्देश केंद्र सरकारने आणलेल्या ‘नारीशक्ती वंदन अधिनियमा’शी (महिला आरक्षण विधेयक) संबंधित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साकारलेल्या या अधिनियमाला किशोरी पेडणेकर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी केवळ पाठिंबाच दिला नाही, तर अधिकृतरीत्या ‘मिस कॉल’ देऊन आपली संमती नोंदवली. महिला सक्षमीकरणाच्या या मोठ्या मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल चित्रा वाघ यांनी किशोरी पेडणेकर यांची भेट घेऊन त्यांचे विशेष आभार मानले.

“विचार वेगळे असले तरी महिलांच्या प्रश्नावर आम्ही एकत्र”
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये या भेटीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांनी म्हटले की, “राजकारणात आमचे विचार वेगळे असू शकतात आणि कितीही मतभेद असले तरी, जेव्हा महिलांच्या हक्काचा आणि सक्षमीकरणाचा प्रश्न येतो, तेव्हा सर्व महिला एकत्र येतात.” मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि माजी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दाखवलेला हा समजूतदारपणा महिला शक्तीच्या ऐक्याचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – Supriya Sule on Asha Bhosle: ‘मंगेशकर आणि पवार कुटुंबाचे पिढ्यानपिढ्यांचे ऋणानुबंध’; सुप्रिया सुळे यांनी वाहिली आशा ताईंना श्रद्धांजली

चित्रा वाघ यांनी ट्विट करत मानले आभार
चित्रा वाघ यांनी किशोरी पेडणेकर यांना धन्यवाद देताना लिहिले, “नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात साकारलेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाला किशोरीताईंनी मिस कॉल देऊन जो पाठिंबा दिला, तो नक्कीच स्वागतार्ह आहे. महिलांच्या सशक्तिकरणासाठी व्यक्त केलेला हा पाठिंबा मोलाचा आहे. धन्यवाद किशोरीताई!” या भेटीमुळे राजकारणात शत्रुत्व असले तरी सामाजिक हिताच्या मुद्द्यांवर संवाद शक्य आहे, हा सकारात्मक संदेश गेला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number