Satara Drugs Case: ‘शिंदे कुटुंबाचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही, विरोधकांकडून बदनामीचा कट’; मुख्यमंत्र्यांकडून शिंदेंची पाठराखण

या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता जोरदार वाकयुद्ध रंगले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बचाव केला आहे.

Satara Drugs Case: ‘शिंदे कुटुंबाचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही, विरोधकांकडून बदनामीचा कट’; मुख्यमंत्र्यांकडून शिंदेंची पाठराखण

Satara Drugs Case: साताऱ्यातील सावरी गावात उघडकीस आलेल्या 145 कोटींच्या ड्रग्ज साठ्यावरून राज्यातील राजकारण कमालीचे तापले आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता जोरदार वाकयुद्ध रंगले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बचाव केला आहे, तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करणाऱ्या पोलीस दलाचे कौतुक केले. मात्र, या तपासात एकनाथ शिंदेंचे नाव ओढण्यावरून त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, आतापर्यंतच्या तपासात शिंदे कुटुंबाचा या प्रकरणाशी दुरान्वयेही संबंध आढळलेला नाही. केवळ राजकीय द्वेषातून शिंदेंना लक्ष्य करणे हे निषेधार्ह आणि चुकीचे आहे. दरम्यान, याचवेळी फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा मंजूर झाल्याची माहिती दिली. त्यांच्या खात्यांचा अतिरिक्त कार्यभार आता अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

हेही वाचा – Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंचा पाय आणखीन खोलात; राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

स्वत: न्यायाधीश बनू नका; सुषमा अंधारेंचा पलटवार

मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंची पाठराखण केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या 'क्लीन चिट' देण्याच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायदान करण्याचे काम न्यायालयाचे आहे, मुख्यमंत्र्यांचे नाही. जर मुख्यमंत्रीच निकाल देणार असतील, तर न्यायालये बंद करून त्यांच्या कार्यालयाबाहेर 'क्लीन चिट केंद्र' अशी पाटी लावा, असा खोचक टोला अंधारे यांनी लगावला.

हेही वाचा – Shirdi Sai Baba: साईदरबाराची झळाळी वाढली, भक्ताकडून सुवर्ण मुकूट दान; वजन आणि किंमत वाचून थक्क व्हाल

अंधारे यांच्या प्रमुख मागण्या आणि आरोप 

तथापी, सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे की, ड्रग्ज सापडलेली जागा प्रकाश शिंदे यांच्या मालकीची आहे. एकनाथ शिंदे सत्तेत असल्याने या तपासावर दबाव येऊ शकतो. तपास निष्पक्ष व्हावा यासाठी एकनाथ शिंदेंनी काही काळ पदापासून दूर राहावे. मी थेट उपमुख्यमंत्र्यांवर आरोप करत नसून, त्यांच्या भावाच्या (प्रकाश शिंदे) मालकीच्या जागेत सापडलेल्या साठ्याबद्दल जाब विचारत आहे, असंही यावेळी सुषमा अंधारे यांनी नमूद केलं आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number