Iran-US Conflict: ’48 तासांत इराणमध्ये हाहाकार माजणार…’; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या 10 दिवसांच्या अल्टिमेटमची मुदत आता संपत आली असून, त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत इराणला धडकी भरवणारा इशारा दिला आहे.

Iran-US Conflict: ’48 तासांत इराणमध्ये हाहाकार माजणार…’; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

Iran-US Conflict: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज 35 वा दिवस असून, जागतिक शांततेसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या 10 दिवसांच्या अल्टिमेटमची मुदत आता संपत आली असून, त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत इराणला धडकी भरवणारा इशारा दिला आहे. “आता वेळ संपत चालली आहे, पुढील 48 तासांत इराणमध्ये मोठा हाहाकार माजणार,” असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

6 एप्रिलची ‘डेडलाईन’ आणि ट्रम्प यांचा अल्टिमेटम
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला करारासाठी किंवा ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) मार्ग खुला करण्यासाठी 6 एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती. या मुदतीचे आता शेवटचे 48 तास उरले आहेत. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर (Truth Social) आपल्या पोस्टद्वारे या मुदतीची स्पष्ट आठवण करून दिली आहे. ट्रम्प यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे इराणवर अमेरिकेकडून महाविनाशकारी हल्ला होण्याची शक्यता बळावली असून संपूर्ण जगाचे लक्ष आता 6 एप्रिलकडे लागले आहे.

इराणकडून अमेरिकेची लढाऊ विमाने पाडली; संघर्षात मोठी हानी
एकीकडे ट्रम्प इशारा देत असतानाच, इराणनेही अमेरिकेला मोठा लष्करी धक्का दिला आहे. गेल्या 24 तासांत इराणने अमेरिकेची अत्याधुनिक F-35 आणि F-15 ही दोन लढाऊ विमाने, तसेच एक A-10 विमान आणि अनेक लष्करी हेलिकॉप्टर्स पाडली आहेत. या युद्धात अमेरिकेला बसलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा फटका मानला जात आहे. या लष्करी कारवाईमुळे अमेरिकेचा संताप अनावर झाला असून प्रतिहल्ल्याची तयारी पूर्ण झाली आहे.

हेही वाचा – US-China Standoff: जागतिक व्यापारावर नवे संकट! हॉर्मुझनंतर आता ‘या’ कालव्यावरून अमेरिका-चीन आमनेसामने; भारताची चिंता वाढली

मध्यस्थीचे प्रयत्न अपयशी; पाकिस्तानलाही धक्का
या युद्धाच्या काळात पाकिस्तान हा डोनाल्ड ट्रम्प आणि इराण यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, इराणने पाकिस्तानचे सर्व प्रस्ताव आणि ट्रम्प यांच्या अटी धुडकावून लावल्या आहेत. इराणने मध्यपूर्वेमध्ये इस्रायल आणि अमेरिकेविरुद्धचे आपले हल्ले कमी करण्याऐवजी अधिक तीव्र केले आहेत. कोणत्याही तोडग्यावर पोहोचण्यास इराणने नकार दिल्याने आता लष्करी कारवाईशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number