Anna Hazare Protest: ‘भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे नियम बदला, अन्यथा…’; अण्णा हजारेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र, 5 जुलैपासून उपोषणाचा इशारा

अण्णा हजारे येत्या 5 जुलै 2026 पासून अहमदनगरमधील राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

Anna Hazare Protest: ‘भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे नियम बदला, अन्यथा…’; अण्णा हजारेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र, 5 जुलैपासून उपोषणाचा इशारा

Anna Hazare Protest:  माहिती अधिकार कायद्यात (RTI) राज्य सरकारने केलेल्या बदलांमुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. वयाच्या नव्वदीतही अण्णांनी भ्रष्टाचाराविरोधात दंड थोपटले असून, सरकारला थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने आरटीआय संदर्भात 12 जून 2026 रोजी लागू केलेली नवीन नियमावली रद्द करावी, या मागणीसाठी अण्णा हजारे येत्या 5 जुलै 2026 पासून अहमदनगरमधील राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र पाठवून आपल्या तीव्र भावना कळवल्या आहेत.

नव्या नियमांमुळे भ्रष्टाचाराला मिळणार खतपाणी
दरम्यान, राज्य सरकारने माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवण्यासाठी जे नवीन निकष आणि जाचक अटी लागू केल्या आहेत, त्यामुळे आरटीआय कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप आहे. हे नवीन नियम माहिती अधिकाराची धार बोथट करणारे आणि प्रशासनातील पारदर्शकता संपुष्टात आणून भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे आहेत, असा थेट आरोप अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रात केला आहे. सरकारने हे जाचक नियम तातडीने मागे न घेतल्यास आंदोलन अटळ असल्याचा इशारा अण्णांनी दिला आहे.

अण्णांचा मुख्यत्वे कोणत्या तरतुदींना आहे आक्षेप?
अण्णा हजारे यांनी सरकारच्या नवीन नियमावलीतील काही विशिष्ट अटींवर तीव्र बोट ठेवले आहे:

एक विषय, एक अर्ज: या नवीन अटीमुळे सर्वसामान्यांना व्यापक माहिती मिळवणे अत्यंत क्लिष्ट आणि कठीण होणार आहे.

ओळखपत्राची सक्ती: अर्जदाराला स्वतःची ओळख पटवून देणारे ओळखपत्र जोडणे अनिवार्य केल्यामुळे कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

भरमसाठ शुल्कवाढ: माहिती मागवण्यासाठी शुल्कात करण्यात आलेल्या मोठ्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

हेही वाचा – Maharashtra Political Crisis: 6 बंडखोर खासदार शिवसेनेत; 7 व्या खासदाराचे गूढ, मनीषा कायंदे काय म्हणाल्या?

तथापि, वयाच्या या टप्प्यावरही अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या या एल्गारामुळे राज्य सरकार आता नेमकी काय भूमिका घेणार, नवीन नियम मागे घेऊन पाऊल मागे टाकणार की अण्णांना पुन्हा एकदा उपोषणाच्या मैदानात उतरावे लागणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number