Chandranath Rath: समोर मृत्यू उभा ठाकला! मोटरसायकलवरून आले अन्…; सुवेंदू अधिकारींच्या PA सोबत नेमकं काय काय घडलं? प्रत्यक्षदरर्शींनी सांगितला थरारक अनुभव

हा हल्ला करण्यासाठी आठ हल्लेखोर चार मोटरसायकलवरून आले होते. घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी या भीषण हल्ल्याचे थरारक वर्णन केले आहे.

Chandranath Rath: समोर मृत्यू उभा ठाकला! मोटरसायकलवरून आले अन्…; सुवेंदू अधिकारींच्या PA सोबत नेमकं काय काय घडलं? प्रत्यक्षदरर्शींनी सांगितला थरारक अनुभव

पश्चिम बंगालमधील भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे निकटचे सहकारी चंद्रनाथ रथ यांची बुधवारी रात्री उशिरा निर्घृणपणे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कोलकाताजवळील मध्यमग्राम परिसरात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीला घेरून गोळीबार केला. हा हल्ला करण्यासाठी आठ हल्लेखोर चार मोटरसायकलवरून आले होते. घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी या भीषण हल्ल्याचे थरारक वर्णन केले आहे.

एका प्रत्यक्षदर्शीने रस्त्यावर एक पांढरी स्कॉर्पिओ कार उभी असल्याचे पाहिल्याचे सांगितले. गाडीतील चालक जोरजोरात रडत होता आणि “साहेब, तुम्हाला काय झाले?” असे विचारत होता. प्रत्यक्षदर्शीनुसार, “जेव्हा आम्ही गाडीजवळ पोहोचलो, तेव्हा आम्ही पाहिले की दुसऱ्या सीटवर बसलेला माणूस (चंद्रनाथ) पूर्णपणे रक्ताने माखलेला होता. त्याच्या छातीतून मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होते आणि त्याच्या तोंडातून अस्पष्ट आवाज येत होते. तो जिवंत होता पण बोलण्याच्या स्थितीत नव्हता.” स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि चालकाला दोघांनाही विलंब न लावता रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले.

हेही वाचा – Suvendu Adhikari PA Killed: मोठी बातमी! मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणाऱ्या सुवेंदु अधिकारींच्या PAला भररस्त्यात गोळ्या घालून संपवलं 

पोलिसांच्या आणि प्राथमिक तपासानुसार, हा हल्ला पूर्वनियोजित होता. चंद्रनाथ रथ बुधवारी रात्री उशिरा कोलकाताहून उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील दोहरिया (जेस्सोर रोड) येथील त्यांच्या फ्लॅटवर परत येत होते.

४ बाईक्स आणि ८ हल्लेखोर: स्कॉर्पिओचा वेग कमी होताच, हेल्मेट घातलेले ८ हल्लेखोर ४ मोटरसायकलवरून आले. त्यांनी अगदी जवळून किमान ४ गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळून गेले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number