Suryakumar Yadav : T20 ट्रॉफी घेऊन सूर्यकुमार यादवने घेतलं बाप्पाचं दर्शन; गौतम गंभीरसह सिद्धिविनायकाच्या चरणी झाला नतमस्तक

सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2026 चे विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचला आहे.

Suryakumar Yadav : T20 ट्रॉफी घेऊन सूर्यकुमार यादवने घेतलं बाप्पाचं दर्शन; गौतम गंभीरसह सिद्धिविनायकाच्या चरणी झाला नतमस्तक

Suryakumar Yadav: भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आज मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी सूर्याने विश्वचषकाची ट्रॉफी देखील सोबत आणली होती. विश्वचषक जिंकण्याचा आनंद सूर्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. नुकताच सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2026 चे विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सूर्या आणि गंभीर आज बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी त्यांनी विशेष पूजा-आरती केली, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पाच वर्ष पूर्ण  
योगायोगाची बाब म्हणजे, आज सूर्यकुमार यादवच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवासाला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास निमित्ताने त्याने सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. “पाच वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आजही तितकेच ताजे आहे,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारताची निळी जर्सी परिधान करण्याचा अभिमान आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी मिळालेले सहकार्य यासाठी त्याने बीसीसीआय (BCCI) आणि आपल्या चाहत्यांचे विशेष आभार मानले आहेत.

हेही वाचा – BCCI NAMAN Awards 2026 जाहीर; शुभमन गिल ‘पॉली उमरीगर’ पुरस्काराने सन्मानित, स्मृती मंधानाचाही मोठा गौरव

विश्वचषकाचा विजय आणि पुढील वाटचाल
विश्वचषकाच्या विजयानंतर सूर्यकुमार यादव सध्या विश्रांतीवर असला तरी, त्याच्या नेतृत्वाचे आणि मैदानातील चपळाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. सिद्धिविनायक दर्शनावेळी माध्यमांशी बोलताना त्याने हा विजय संपूर्ण देशाचा असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले. प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने मिळवलेले हे यश आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल 2026 साठी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवणारे ठरेल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number