Pakistan Car Blast: इस्लामाबाद उच्च न्यायालयाजवळ कारमध्ये भीषण स्फोट; पाच जणांचा मृत्यू

स्फोटानंतर गाडीला आग लागली आणि परिसरात दाट धूर पसरला, ज्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. स्फोटाच्या वेळी न्यायालयात मोठी गर्दी होती.

Pakistan Car Blast: इस्लामाबाद उच्च न्यायालयाजवळ कारमध्ये भीषण स्फोट; पाच जणांचा मृत्यू

Pakistan Car Blast: पाकिस्तानच्या राजधानी इस्लामाबादमध्ये मंगळवारी सकाळी भीषण स्फोट झाला. हा स्फोट सेक्टर G-11 मधील उच्च न्यायालयाजवळील न्यायालयीन संकुलात झाला असून, प्राथमिक माहितीनुसार पाच जणांचा मृत्यू झाला असून यात 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार, न्यायालयीन संकुलाच्या पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या कारमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटानंतर गाडीला आग लागली आणि परिसरात दाट धूर पसरला, ज्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. स्फोटाच्या वेळी न्यायालयात मोठी गर्दी होती, ज्यात अनेक वकील आणि सामान्य नागरिकांचा समावेश होता. पोलीस आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून, संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी आसपासच्या भागात तपास आणि शोधमोहीम सुरू केली आहे.

हेही वाचा – PM Modi on Delhi Blast: लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणू”

सलग हल्ल्यांनी पाकिस्तानात तणाव वाढला

दरम्यान, पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात देखील सुरक्षा दलांच्या ताफ्यावर IED स्फोटाद्वारे हल्ला करण्यात आला. या घटनेत किमान 16 सैनिक जखमी झाले आहेत. याशिवाय, सोमवारी दक्षिण वझिरीस्तान जिल्ह्यातील कॅडेट कॉलेजवर आत्मघातकी बॉम्बरचा हल्ला झाला, ज्यात सहा जण जखमी झाले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासात सांगितले की, या हल्ल्यांमागे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या बंदी घातलेल्या संघटनेचा हात असू शकतो. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली असून, पोलीस व लष्करी दलांनाच लक्ष्य करण्यात येत आहे.

हेही वाचा – Donald Trump : भारतावरील टॅरिफ होणार कमी?; डोनाल्ड ट्रम्प भारताविषयी म्हणाले '…आम्ही खूप जवळ आलो आहोत'

पाकिस्तानात वाढती अस्थिरता

अफगाणिस्तान सीमेजवळील भागांमध्ये टीटीपी आणि इतर अतिरेकी गट सक्रिय झाले आहेत. वारंवार होणाऱ्या स्फोटांमुळे देशातील आंतरिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इस्लामाबादसह प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा दलांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number