Middle East Conflict: कॅप्टनची जबरदस्त हुशारी! युद्धाच्या आगीतून मार्ग काढत कच्च्या तेलाचा टँकर मुंबईत दाखल, थरारक गोष्ट एकदा वाचाच

सौदी अरेबियातून कच्चे तेल वाहून नेणारा एक महाकाय टँकर भारतीय कॅप्टनच्या प्रसंगावधानामुळे सुरक्षितपणे मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचला आहे.<br/>

Middle East Conflict: कॅप्टनची जबरदस्त हुशारी! युद्धाच्या आगीतून मार्ग काढत कच्च्या तेलाचा टँकर मुंबईत दाखल, थरारक गोष्ट एकदा वाचाच

Middle East Conflict: मध्यपूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज 13 वा दिवस असून हा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) तेल टँकरना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. मात्र, अशा अत्यंत धोकादायक परिस्थितीतही भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सौदी अरेबियातून कच्चे तेल वाहून नेणारा एक महाकाय टँकर भारतीय कॅप्टनच्या प्रसंगावधानामुळे सुरक्षितपणे मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचला आहे.

कॅप्टनची 'ती' युक्ती आणि यशस्वी मिशन
सौदी अरेबियातून 135,335 मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन निघालेला 'शेनलॉन्ग' (Shenlong) हा लायबेरियाचा ध्वजांकित टँकर मुंबईत दाखल झाला आहे. हे यश केवळ कॅप्टनच्या सतर्कतेमुळे शक्य झाले. इराणच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी आणि शत्रूच्या रडारवर न येण्यासाठी कॅप्टनने टँकरची AIS ट्रॅकिंग (सिग्नल) सिस्टम तात्पुरती बंद केली होती. 9 मार्च रोजी हे जहाज पुन्हा ट्रॅकिंग सिस्टममध्ये दिसले आणि अखेर 11 मार्च रोजी ते मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर सुखरूप पोहोचले.

होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडणारे पहिले जहाज
अथेन्सस्थित डायनाकॉम टँकर मॅनेजमेंटद्वारे चालवले जाणारे हे जहाज युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुझची धोकादायक सामुद्रधुनी ओलांडून भारतात पोहोचणारे पहिले मोठे तेल जहाज ठरले आहे. हे जहाज आता मुंबईतील माहुल येथील रिफायनरीजना कच्च्या तेलाचा पुरवठा करणार आहे. प्रादेशिक तणावाच्या या काळात हा यशस्वी प्रवास भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

हेही वाचा – Middle East War: भारतीय परराष्ट्र धोरणाचा 'मास्टरस्ट्रोक'; हॉर्मुज सामुद्रधुनीत भारतीय जहाजांना 'ग्रीन सिग्नल'

इंधन पुरवठ्याबाबत देशाला मोठा दिलासा
मध्यपूर्वेतील युद्धामुळे भारतात इंधनाचा तुटवडा निर्माण होईल की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, 'शेनलॉन्ग' टँकर मुंबईत पोहोचल्यामुळे इंधन पुरवठ्याबाबत तूर्तास मोठा दिलासा मिळाला आहे. कॅप्टनच्या या धाडसी निर्णयामुळे कोट्यवधी रुपयांचे कच्चे तेल आणि जहाज दोन्ही सुरक्षित राहिले असून, भारताकडे जाणारा कच्च्या तेलाचा मार्ग अद्याप खुला असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number