West Bengal Cabinet Expansion: बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; 35 नव्या चेहऱ्यांनी घेतली शपथ

'लोक भवन' येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात राज्यपाल आर.एन. रवी यांनी 35 नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

West Bengal Cabinet Expansion: बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; 35 नव्या चेहऱ्यांनी घेतली शपथ

West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात भाजपचे सरकार स्थापन होऊन साधारण 22 दिवस उलटल्यानंतर, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पहिला मोठा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. 'लोक भवन' येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात राज्यपाल आर.एन. रवी यांनी 35 नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या नवीन मंत्रिमंडळात भाजपमधील अनेक दिग्गज आणि प्रमुख चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे.

तीन स्तरांवर मंत्र्यांचे वर्गीकरण; 13 नेत्यांना कॅबिनेट तर 19 जणांना राज्यमंत्रीपद
या शपथविधी सोहळ्यात एकूण 35 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये 13 कॅबिनेट मंत्री, 3 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 19 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांचा समतोल साधत प्रादेशिक समीकरणे लक्षात घेऊन या मंत्रिमंडळाची रचना करण्यात आल्याचे दिसते.

खात्यांचे वाटप अद्याप प्रलंबित; सर्वांचे लक्ष नियोजनाकडे
मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया आणि सर्व 35 मंत्र्यांच्या नावांची घोषणा अधिकृतपणे झाली असली, तरी अद्याप कोणत्याही नेत्याला त्यांच्या खात्यांचे वाटप करण्यात आलेले नाही. सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील या नव्या सरकारमध्ये कोणत्या नेत्याच्या गळ्यात गृह, वित्त किंवा महसूल यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची माळ पडणार, याकडे आता राजकीय विश्लेषकांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा – TMC Leader Attacked: अभिषेक बॅनर्जींनंतर, ममता बॅनर्जींच्या आणखी एका निकटवर्तीयावर जमावाचा हल्ला; हल्ल्याचा व्हिडीओ समोर

शपथ घेतलेल्या मंत्र्यांची संपूर्ण यादी:

कॅबिनेट मंत्री (एकूण 13)
दीपक बर्मन
तपस रॉय
डॉ. शंकर घोष
मनोज कुमार ओरांव
अर्जुन सिंग
गौरी शंकर घोष
स्वपन दासगुप्ता
जगन्नाथ चट्टोपाध्याय
कल्याण चक्रवर्ती
अजय पोद्दार
शरद्वत मुखर्जी
दूध कुमार मंडल
अनुप कुमार दास

राज्यमंत्री – स्वतंत्र प्रभार (एकूण 3)
डॉ. इंद्रनील खान
मालती राभा रॉय
राजेश महतो

राज्यमंत्री (एकूण 19)
जोएल मुर्मू
हरे कृष्ण बेरा
आनंदमय बर्मन
अशोक दिंडा
नादियार चांद बौरी
विशाल लामा
शांतनू प्रमाणिक
मौमिता विश्वास मिश्रा
उमेश रॉय
पूर्णिमा चक्रवर्ती
कौशिक चौधरी
भास्कर भट्टाचार्य
दिवाकर घरामी
अमिया किस्कु
कलिता माझी
गार्गी दास घोष
बिराज विश्वास
दिपांकर जाना
सुमाना सरकार
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number