उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंक ई- रिक्षा वितरणाचा कार्यक्रम

पुणे: महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यासाठी 4 हजार महिलांना 'पिंक-ई रिक्षा' वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले असून, पुणे जिल्ह्यात 20 ते 50 वर्षे वयोगटातील 3 हजार 230 इच्छुक महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 1 हजार 726 लाभार्थ्यांना मंजुरी दिली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील 60 लाभार्थी महिलांना सोमवारी दुपारी […]

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंक ई- रिक्षा वितरणाचा कार्यक्रम

पुणे: महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यासाठी 4 हजार महिलांना 'पिंक-ई रिक्षा' वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले असून, पुणे जिल्ह्यात 20 ते 50 वर्षे वयोगटातील 3 हजार 230 इच्छुक महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 1 हजार 726 लाभार्थ्यांना मंजुरी दिली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील 60 लाभार्थी महिलांना सोमवारी दुपारी 1 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे 60 कायनेटिक ग्रिन कंपनीच्या 'पिंक ई-रिक्षा' वितरीत करण्यात आले.

महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीने 8 जिल्ह्यांतील महिलांना आणि मुलींना रोजगार निर्मितीसाठी चालना देऊन त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच शशक्तीकरणासाठी महिलांना आणि मुलींना सुरक्षित प्रवास करता यावेत, यासाठी शहरात इच्छुक असणाऱ्या महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य, रिक्षा चालविण्यासाठी आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी 'पिंक ई-रिक्षा' ही योजना सुरू करण्यात आली आहे.

या कार्यक्रमात महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे, महिला आणि बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, महिला आणि बाल विकास विभाग सचिव डॉ. अनुपकुमार यादव, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त महिला आणि बाल विकास नयना गुंडे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number