तब्बल 14 हजार पुरुषांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ! सरकार गुन्हा दाखल करून पै न् पै वसूल करणार..

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना गरजू महिलांसाठी असतानाही तब्बल 14 हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचा गैरप्रकार समोर आला. सरकार त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्याच्या तयारीत आहे.

तब्बल 14 हजार पुरुषांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ! सरकार गुन्हा दाखल करून पै न् पै वसूल करणार..

मुंबई : गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने राज्यातील गोरगरिब महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेतून सरकार कमी उत्पन्न असलेल्या महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य करते.या योजनेचा लाभ जवळपास 2 कोटी महिलांनी घेतला. परंतु निवडणूक काळात योग्य पडताळणी प्रक्रिया न झाल्याचा फायदा उठवून जवळपास 14 हजार पुरुषांनीही लाडक्या बहिणीचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. आता सरकार या बोगस लाभधारकांवर कारवाईचा बडगा उचलण्याच्या तयारीत आहे.

अडीच लाखांच्या खालील उत्पन्न असणाऱ्या लाडक्या बहिणींना सरकार दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य करते. ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली. या योजनेचा जवळपास 2 कोटी महिलांनी लाभ घेतला. याचा सरकारला निवडणुकीतही प्रचंड फायदा झाला. आता या योजनेचा अवैधपणे लाभ उठवणाऱ्या महिला अपात्र ठरत आहेत. यासोबतच, तब्बल 14 हजार  पुरुषांनी महिलांसाठी असलेल्या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. सरकारच्या तिजोरीवर वर्षाला जवळपास 46 हजार कोटींचा ताण पडल्याने शासनस्तरावर वेगवान पडताळणीला सुरुवात झाली.

हेही वाचा – रक्षाबंधनाच्या दिवशी गोड बातमी!, फडणवीस सरकारची लाडक्या बहिणींना ओवाळणी

दरम्यान, गरजू महिलांसाठी आणलेल्या या योजनेचा लाडक्या दाजींनी लाभ घेतल्याचे वृत्त दोन आठवड्यांपूर्वी समोर आल्यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. आता सरकार संबंधित 14 हजार पुरुषांवर कारवाईचा बडगा उगारण्याच्या तयारीत आहे. प्रामुख्याने बोगस खात्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सरकारमधील सूत्रांनी सांगितले. 14 हजारांहून अधिक पुरुषांनी त्या योजनेचे पैसे घेतल्याचे समोर आल्यानंतर पडताळणी प्रक्रियेतील मोठा गैरप्रकार समोर आला. यामुळे शासनाच्या हेतूवर शंका उपस्थित करत अनेकांनी आक्षेप नोंदवला. शिवाय, लाडकी बहीण ही मतांसाठी सुरू केलेली योजना होती, अशी टीका सरकारवर सुरुवातीपासून होते आहेच.

महिलांनी स्वतःच्या घरातील पुरुषांचे बँक खाते नंबर दिले
स्वतःचे बँक खाते नसलेल्या काही महिलांनी त्यांच्या घरातील पुरुषांच्या खात्याची माहिती या योजनेचे पैसे मिळण्यासाठी नोंद केली. ही बाब आताच्या पडताळणीत समोर आली आहे. अशा महिलांना लाभाचे पैसे मिळत राहणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र, ज्या बोगस लाभधारकांची माहिती समोर येईल, त्यांच्याकडून 11 महिन्यांचे पूर्ण पैसे वसूल करण्यात येणार आहेत. तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

संशयित 26 लाख खात्यांची माहिती पडताळ्यास सुरुवात
महिला आणि बालकल्याण खात्याकडून केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान खात्याने पाठवलेला 26 लाख लोकांची माहिती पडताळणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर पुढील 15 दिवसांत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याच 26 लाख लाभार्थ्यांपैकी काही लाख महिलांची बँकेत स्वतःची खातीच नसल्यामुळे त्यांनी कुटुंबातील पुरुषांच्या बँक खात्याची माहिती त्यावेळी जोडल्याची बाब समोर आली आहे. अशा महिलांचा लाडक्या बहिणींचा लाभ सुरूच राहणार आहे. या महिलांना योजनेचा लाभ मिळत राहील.

हेही वाचा – Mumbai Rain: मुंबईकर पावसाच्या धारांपेक्षा घामाच्या धारांनी हैराण, उन्हाळ्यासारखा उकाडा

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करणार
महिला व बालकल्याण खात्याकडून बोगस खातेधारकांकडून 11 महिन्यांचे 16 हजार 500 रुपये वसूल करण्यात येणार आहेत. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number