Marathi Signboards: मुंबई महानगरपालिकेकडून अमराठी नामफलकांवर विशेष कारवाई; 14 मे ते 26 मे दरम्यान हजारो आस्थापनांची होणार तपासणी

पालिकेकडून अमराठी नामफलकांवर विशेष कारवाई करण्यासाठी शहराच्या विविध विभागांमध्ये एका विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

Marathi Signboards: मुंबई महानगरपालिकेकडून अमराठी नामफलकांवर विशेष कारवाई; 14 मे ते 26 मे दरम्यान हजारो आस्थापनांची होणार तपासणी

Marathi Signboards: मुंबई शहरातील दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांवर मराठीत नामफलक (सायनबोर्ड) असणे कायद्याने बंधनकारक असतानाही, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता मुंबई महानगरपालिकेने (BMC) कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पालिकेकडून अमराठी नामफलकांवर विशेष कारवाई करण्यासाठी शहराच्या विविध विभागांमध्ये एका विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व व्यावसायिक ठिकाणांवरील मराठी नामफलकांची कसून तपासणी केली जात आहे.

हेही वाचा – Eknath Shinde – BJP : शिंदेंना शह! माजी महापौरांसोबत भाजप नेत्यांची खलबतं; रवींद्र फाटक, क्षितीज ठाकूरनंतर तिसरा बडा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात?

14 मे ते 26 मे दरम्यान विशेष मोहीम; हजारो आस्थापनांवर पालिकेची नजर
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 14 मे ते 26 मे दरम्यान ही विशेष तपासणी आणि कारवाईची मोहीम राबवली जात आहे. या कालावधीत मुंबईतील विविध भागांमधील हजारो लहान-मोठ्या दुकानांची आणि व्यावसायिक आस्थापनांची प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. ज्या आस्थापनांवर मराठीत किंवा देवनागरी लिपीत ठळक नामफलक आढळणार नाहीत, त्यांच्यावर पालिकेकडून तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई; पालिकेचा इशारा
मुंबईत राहून आणि व्यवसाय करूनही मराठी भाषेला डावलणाऱ्या आणि केवळ अमराठी भाषेत नामफलक लावणाऱ्या व्यावसायिकांना या मोहिमेद्वारे कडक इशारा देण्यात आला आहे. पालिकेचे पथक प्रत्येक प्रभागात जाऊन तपासणी करत असून, नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मराठी भाषेचा आदर राखण्यासाठी आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number