धक्कादायक! महापालिका निवडणुकीत प्रतिस्पर्धीला हरवण्यासाठी जादूटोण्याचा प्रकार?, राजकीय वर्तुळात खळबळ

निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आणि आपल्याला हरवण्यासाठी विरोधकांनी जादूटोण्याचा आधार घेतल्याचा दावा शिंदे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! महापालिका निवडणुकीत प्रतिस्पर्धीला हरवण्यासाठी जादूटोण्याचा प्रकार?, राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik Mahapalika Election 2026 : नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जात आता ‘जादूटोणा’ आणि ‘अघोरी’ प्रथांची चर्चा सुरू झाली आहे. नाशिकमधील प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेनेचे उमेदवार विलास शिंदे यांनी आपल्या विरोधकांवर अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आणि आपल्याला हरवण्यासाठी विरोधकांनी जादूटोण्याचा आधार घेतल्याचा दावा शिंदे यांनी केल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मंतरलेले तांदूळ आणि हळदी-कुंकवाचा सडा
विलास शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 6 वाजता त्यांच्या मोबाईलवर काही व्हिडिओ आणि संदेश आले. गंगापूर गाव, आनंदली गाव आणि परिसरातील मोठ्या सोसायट्यांच्या बाहेर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर हळद-कुंकू लावलेले ‘मंतरलेले’ तांदूळ टाकण्यात आले होते. “हा सर्व प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला असून, हा केवळ जादूटोणा नसून लोकशाहीचा अवमान आहे,” असे विलास शिंदे यांनी म्हटले आहे. प्रचारासाठी घरोघरी जात असताना अशा घटना समोर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा – Ganesh Naik On Eknath Shinde : ‘माझ्या नादाला लागू नका, अन्यथा टांगा पलटी अन् घोडे बेपत्ता करील…’; गणेश नाईक यांचा एकनाथ शिंदेंना इशारा

लोकशाही की अंधश्रद्धा? विरोधकांवर निशाणा
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच त्यांना आता अशा अघोरी मार्गांचा अवलंब करावा लागत असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. या संदर्भात बोलताना शिंदे म्हणाले, “आमचे सर्व उमेदवार निष्कलंक असून आम्ही केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनतेसमोर जात आहोत. जादूटोण्याद्वारे निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना प्रभाग क्रमांक 8 मधील जनता 15 जानेवारी रोजी मतदानातून चोख उत्तर देईल. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असून पोलीस प्रशासनाकडे तक्रार करण्याची तयारीही सुरू आहे.”

येत्या 15 जानेवारी 2026 रोजी नाशिक महापालिकेसाठी मतदान होणार असून, त्यापूर्वी घडलेल्या या प्रकारामुळे मतदारांमध्येही उलटसुलट चर्चा सुरू आहे. ‘सुपर संडे’ निमित्त सर्वच राजकीय पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करत असताना, नाशिकमध्ये विज्ञानाच्या युगात अशा प्रकारच्या अंधश्रद्धेचा वापर होणे ही दुर्दैवी बाब असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे. आता या कथित जादूटोणा प्रकरणाचा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा – Sanjay Raut: ‘आजही आम्ही 10 मिनिटांत मुंबई बंद करू शकतो’; संजय राऊतांचा थेट इशारा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number