Manikrao Kokate On BJP : ‘भाजप बाटलेला पक्ष…’; माणिकराव कोकाटे यांची बोचरी टीका

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे महायुतीच्या तीनही घटक पक्षांमध्ये उघड उघड संघर्षाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Manikrao Kokate On BJP : ‘भाजप बाटलेला पक्ष…’; माणिकराव कोकाटे यांची बोचरी टीका

Manikrao Kokate On BJP : राज्यातील नगरपरिषद निवडणुकांचे रण तापत असताना प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र अधिकच तीव्र झाले आहे. विशेषत: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे महायुतीच्या तीनही घटक पक्षांमध्ये उघड उघड संघर्षाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाची शिवसेना या तिन्ही पक्षांत आपापसातच चुरस निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते आणि राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सिन्नरमधील प्रचारसभेत भाजपवर जोरदार टीका करत वातावरण आणखी तापवले. त्यांच्या विधानांमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद ठळकपणे पुढे आले आहेत.

भाजप फोडाफोडीत व्यस्त, निष्ठावंत मात्र दुर्लक्षित’ – कोकाटे

राष्ट्रवादी उमेदवार विठ्ठल राजे उगले यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत कोकाटे म्हणाले, ‘भाजपने विधानसभा निवडणुकीत माझ्या घरातील माणूस फोडला. आता राजाभाऊ वाजे यांच्या कुटुंबातील व्यक्तीला पण फोडलं. पक्ष फोडणे हेच भाजपा नेत्यांचं मुख्य काम झालंय. भाजप पूर्णपणे बाटलेला पक्ष आहे. निष्ठावंत कार्यकर्ते घरी पडून आहेत आणि फोडाफोडीतलं राजकारण मात्र अखंड सुरु आहे.’

हेही वाचा – Pravin Darekar On Deepak Kesarkar: नारायण राणे यांची काळजी करू नका…’; प्रवीण दरेकर यांचा दीपक केसरकर यांना सल्ला

मित्रपक्षावरही कोकाटे कडाडले

सभेत शिवसेनेवर टीका करताना त्यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपावरही तितक्याच कठोर शब्दांत हल्ला चढवला. कोकाटे म्हणाले, “मला खोटं बोलता येत नाही, म्हणून माझं खातं बदललं. पण मी दादांचा खरा माणूस आहे. जो शब्द दिला तो पाळतो.” सिन्नरच्या निवडणुकीत महायुतीचे घटक पक्ष एकमेकांवर उघडपणे आरोप करत असल्याने, निवडणुकीच्या तोंडावर युतीतील तणाव अधिकच चिघळल्याचे चित्र दिसत आहे. आगामी मतदानाच्या पार्श्वभूमीवर हे वादळ नेमकी कोणती दिशा घेणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number