Uddhav Thackeray: ‘भाजपने राम मंदिराला आमदार खरेदीचं ATM बनवलं…’; नागपुरात उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

नागपूरमधील महाआरती आणि जाहीर सभेत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला.

Uddhav Thackeray: ‘भाजपने राम मंदिराला आमदार खरेदीचं ATM बनवलं…’; नागपुरात उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

Uddhav Thackeray: नागपूरमधील महाआरती आणि जाहीर सभेत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला. "आम्हाला रामरक्षा स्तोत्र मुखपाठ आहे की नाही, हे तपासणारे देवेंद्र फडणवीस स्वतः वर्गाच्या मॉनिटरसारखे वागत आहेत. त्यांनी आधी हे स्पष्ट करावे की ते रामभक्तांच्या पाठीशी आहेत की मंदिर लुटणाऱ्या चोरांच्या बाजूने?", असा थेट सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. 

अयोध्येतील राम मंदिर हे करोडो हिंदूंच्या श्रद्धेतून उभे राहिले असून ते भाजपच्या मालकीचे नाही, असे सांगत त्यांनी हे मंदिर भाजप आमदारांना खरेदी करण्यासाठी 'एटीएम' बनवले असल्याचा गंभीर आरोपही केला. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली समिती नेमण्याची मागणी त्यांनी केली.

सरसंघचालक मोहन भागवतांना विचारले प्रश्न 
नागपूरच्या या मंचावरून उद्धव ठाकरेंनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना जाहीर साद घातली. "भागवत साहेब, भाजपच्या राजवटीत मंदिरे लुटली जात आहेत, पेपर फुटत आहेत आणि सत्ता मिळवण्यासाठी पक्ष फोडले जात आहेत. हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होते का?", असा सवाल त्यांनी केला. 

दरम्यान, उत्तर प्रदेशातील भाजप नेत्यांच्या उद्दाम वक्तव्यांचा दाखला देत त्यांनी भाजपचे हिंदुत्व ढोंगी असल्याची टीका केली. बाबरी मशिदीच्या पतनावेळी भाजपचे नेते पळून गेले होते, मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अत्यंत छातीठोकपणे शिवसैनिकांची जबाबदारी स्वीकारली होती, याची आठवण करून देत ठाकरे म्हणाले की, आम्हाला आता 'भाजपमुक्त राम' हवा आहे.

हेही वाचा – Sanjay Raut: '…म्हणून सोनम वांगचुक यांच्यावर कारवाई'; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईविरोधात उद्या मुंबईत तीव्र आंदोलनाची घोषणा
दिल्लीत लडाखचे आंदोलक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर झालेल्या दडपशाहीचा उद्धव ठाकरेंनी तीव्र निषेध केला. "रामाचे नाव घेऊन सत्तेत बसलेल्यांच्या अंगात आता सैतान संचारला असून ते हुकूमशाही पद्धतीने वागत आहेत," अशी टीका त्यांनी केली. वांगचुक यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत आपली भेट घेतली होती, असे सांगत त्यांच्या समर्थनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी उद्या मुंबईत महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number