Nashik Municipal Election: नाशिकमध्ये भाजपची फजिती; संकटमोचक गिरीश महाजन अपयशी, 10 बड्या बंडखोरांमुळे कमळ धोक्यात

पक्षाने दिलेली अधिकृत उमेदवारी नाकारून अनेक दिग्गज नेत्यांनी बंडखोरीचे निशाण फडकवले असून, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही त्यांनी माघार घेण्यास नकार दिला.

Nashik Municipal Election: नाशिकमध्ये भाजपची फजिती; संकटमोचक गिरीश महाजन अपयशी, 10 बड्या बंडखोरांमुळे कमळ धोक्यात

Nashik Municipal Election: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नाशिक भाजपमध्ये मोठी पडझड झाल्याचे चित्र समोर आले आहे. पक्षाने दिलेली अधिकृत उमेदवारी नाकारून अनेक दिग्गज नेत्यांनी बंडखोरीचे निशाण फडकवले असून, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, भाजपचे 'संकटमोचक' मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन 2 दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून होते, मात्र बंडखोरांची मनधरणी करण्यात त्यांना अपयश आले आहे.

माजी महापौरांसह सरचिटणीसांचे आव्हान

भाजपच्या या अंतर्गत बंडाळीमुळे पक्षाच्या '100 प्लस' जागा जिंकण्याच्या स्वप्नाला मोठा तडा जाण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये माजी महापौर अशोक मूर्तडक यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार गुरुमित बग्गा यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. तसेच, जिल्ह्याचे सरचिटणीस अमित घुगे यांनी प्रभाग 1 मधून अरुण पवार यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. प्रबळ उमेदवारांनीच बंडखोरी केल्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारांची गणिते बिघडली आहेत.

हेही वाचा – BMC Election 2026: निवडणुकीच्या रणधुमाळीत 'मातोश्री'वर पक्षप्रवेशांचा धडाका; ठाकरेंचा शिंदेंच्या सेनेसह काँग्रेसलाही धक्का

भाजपमधील अंतर्गत वाद 

नाशिकच्या विविध प्रभागांमध्ये भाजप विरुद्ध भाजप असाच सामना रंगणार आहे. प्रभाग 2 मध्ये मच्छिंद्र सानप यांच्यासमोर रुची कुंभारकर यांनी बंडखोरी केली आहे, तर प्रभाग 10 मध्ये समाधान देवरे यांना शशिकांत जाधव यांच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे. प्रभाग 29 मध्ये मुकेश शहाणे, प्रभाग 28 मध्ये दिलीप दातीर, प्रभाग 20 मध्ये अंबादास पगारे आणि प्रभाग 18 मध्ये मीरा हांडगे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध शड्डू ठोकून भाजपची डोकेदुखी वाढवली आहे.

हेही वाचा – Haribhau Rathod vs Rahul Narwekar : 'मी काही लहान माणूस नाही…'; हरिभाऊ राठोड यांचा थेट नार्वेकरांना इशारा

729 उमेदवार मैदानात 

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (2 जानेवारी) नाशिकमध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. एकूण 1,395 उमेदवारांपैकी 666 जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. आता 729 उमेदवार अंतिम रिंगणात असून, यात महाविकास आघाडीने 246 उमेदवारांसह आघाडी घेतली आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीचे 144 उमेदवार रिंगणात आहेत, तर भाजपचे 118 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. भाजपमधील या अंतर्गत बंडाळीचा फायदा विरोधकांना होणार की बंडखोर अपक्ष म्हणून बाजी मारणार, याकडे आता संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number