Sharad Pawar Health Update : मोठी बातमी! शरद पवार यांची प्रकृती खालावली; कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्ससह ताफा पुण्याच्या ‘रुबी हॉल’कडे रवाना

बारामतीतील 'गोविंद बाग' या त्यांच्या निवासस्थानी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर, त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Sharad Pawar Health Update : मोठी बातमी! शरद पवार यांची प्रकृती खालावली; कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्ससह ताफा पुण्याच्या ‘रुबी हॉल’कडे रवाना

Sharad Pawar Health Update : राज्याच्या राजकारणातील भीष्माचार्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याची चिंताजनक माहिती समोर येत आहे. बारामतीतील ‘गोविंद बाग’ या त्यांच्या निवासस्थानी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर, त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या त्यांचा ताफा कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्ससह पुण्याच्या दिशेने निघाला असून सोबत खासदार सुप्रिया सुळे देखील आहेत.

नेमका त्रास काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना गेल्या काही तासांपासून खोकला आणि कफामुळे श्वास घेण्यास त्रास होत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नरम होती, मात्र सोमवारी दुपारी त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांचे पथक तातडीने गोविंद बागेत दाखल झाले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे.

अजितदादांच्या निधनानंतरची दगदग ठरली कारणीभूत?
अजित पवार यांच्या अकाली आणि अपघाती निधनानंतर पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या आठ दिवसांपासून राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते सांत्वनासाठी बारामतीमध्ये येत आहेत. या कठीण काळात शरद पवार स्वतः सर्वांच्या भेटीगाठी घेत होते. या प्रचंड दगदगीमुळे आणि मानसिक तणावामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – ZP Election Result 2026: ग्रामीण महाराष्ट्रात ‘कमळ’ फुललं; शिंदे गटाची सेंच्युरी, जाणून घ्या झेडपी निवडणुकीचा सविस्तर निकाल

रुबी हॉल क्लिनिक सज्ज
पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. रुबी हॉलचे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार साहेब पुण्यात पोहोचल्यानंतर त्यांची सविस्तर वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतरच त्यांना रुग्णालयात दाखल करायचे की घरी सोडायचे, याबाबतचा निर्णय घेतला जाईल. सध्या रुग्णालयाबाहेर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

राजकीय धाकधूक वाढली
एकीकडे राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांचा धुरळा उडाला असतानाच, दुसरीकडे शरद पवार यांच्या प्रकृतीची बातमी आल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बारामतीपासून पुण्यापर्यंतच्या मार्गावर पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था केली असून त्यांचा ताफा लवकरच पुण्यात पोहोचेल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number