मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या सल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळातील ‘या’ प्रमुख मंत्र्याचा राजीनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानाच्या कलम 75(2) अंतर्गत हा राजीनामा तात्काळ प्रभावाने मंजूर केला आहे.

मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या सल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळातील ‘या’ प्रमुख मंत्र्याचा राजीनामा

मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळातून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. रेल्वे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणारे रवनीत सिंग बिट्टू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानाच्या कलम 75(2) अंतर्गत हा राजीनामा तात्काळ प्रभावाने मंजूर केला आहे. राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकानंतर बिट्टू यांचे केंद्रीय मंत्रिमंडळातील स्थान संपुष्टात आले आहे.

हेही वाचा – Shivaji Park NEET Protest : शिवाजी पार्कवर हजारो तरुणांचा एल्गार; आदित्य ठाकरेंच्या फोनवरून अभिजित दिपकेंचा मुंबईतील तरुणांशी संवाद

पंजाबच्या राजकारणातील महत्त्वाचा चेहरा
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात बिट्टू यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्रीपदाव्यतिरिक्त अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्रीपदाचाही अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. पंजाब राजकारणात सक्रिय असणाऱ्या बिट्टू यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

पराभवानंतरही दिली होती महत्त्वाची जबाबदारी
लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागूनही भाजप नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. पंजाबमध्ये पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी आणि संघटन विस्ताराच्या रणनीतीचा भाग म्हणून त्यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना राज्यसभा खासदार म्हणून संसदेत पाठवण्याची योजना पक्षाकडून आखण्यात आली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number