Rinku Singh: भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का! वडिलांच्या निधनामुळे रिंकू सिंग वेस्ट इंडिजविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याला मुकणार

रिंकू सिंग याचे वडील खानचंद सिंग यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून कर्करोगाशी (Cancer) झुंज देत होते.

Rinku Singh: भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का! वडिलांच्या निधनामुळे रिंकू सिंग वेस्ट इंडिजविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याला मुकणार

Rinku Singh:  भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिनिशर रिंकू सिंग याचे वडील खानचंद सिंग यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून कर्करोगाशी (Cancer) झुंज देत होते. शुक्रवारी, 27 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 4:36 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनामुळे रिंकू सिंगवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या कठीण काळात त्याने राष्ट्रीय कर्तव्य सोडून कुटुंबाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्करोगाशी सुरू होती झुंज
खानचंद सिंग यांची प्रकृती 21 फेब्रुवारी रोजी खालावली होती, त्यानंतर त्यांना तातडीने ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रिंकू सिंग यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना खेळून वडिलांना भेटण्यासाठी घरी आला होता, मात्र संघाच्या गरजेपोटी तो पुन्हा संघात सामील झाला होता. शुक्रवारी पहाटे वडिलांच्या निधनाची बातमी मिळताच रिंकू सकाळी 5 वाजता चेन्नईहून विमानाने दिल्लीला पोहोचला आणि थेट रुग्णालयात धाव घेतली.

BCCI कडून अधिकृत दुजोरा आणि शोक व्यक्त
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या दुःखद घटनेवर शोक व्यक्त केला आहे. 'आयएएनएस'शी बोलताना ते म्हणाले, "बीसीसीआयच्या वतीने आम्ही रिंकू सिंग आणि त्याच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. हा त्याच्यासाठी अत्यंत कठीण काळ आहे आणि संपूर्ण बोर्ड त्याच्या पाठीशी उभा आहे." रिंकूच्या अनुपलब्धतेबाबत लवकरच अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या 'करो या मरो' सामन्याला मुकणार
वडिलांच्या अंत्यविधीसाठी रिंकू सिंग आता आपल्या कुटुंबासोबत राहणार असल्याने तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी सुपर-8 सामन्यासाठी उपलब्ध नसेल. टीम इंडिया सध्या कोलकाता येथे या सामन्यासाठी रवाना होत असली, तरी रिंकू संघात नसेल. 1 मार्च रोजी होणारा हा सामना भारतासाठी 'व्हर्च्युअल क्वार्टरफायनल' मानला जात आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार असल्याने, रिंकूची अनुपस्थिती भारतासाठी मोठी अडचण ठरू शकते.

हेही वाचा – T20 World Cup 2026: टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा थरार कधी आणि कुठे रंगणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

क्रिकेट विश्वातून श्रद्धांजली
रिंकू सिंगने आपल्या गरिबीवर मात करून भारतीय संघात स्थान मिळवले होते आणि त्याच्या या प्रवासात त्याच्या वडिलांचे मोठे योगदान होते. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी आणि खेळाडूंनी रिंकूच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय संघ आता रिंकूच्या जागी कोणाला संधी देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number