Baramati, Rahuri Byelection : बिनविरोधचा प्रयत्न फसला; दोन नव्या मित्रांसह काँग्रेसची ‘एन्ट्री’, आता काँटे की टक्कर?

सध्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेऊन सर्वांना चकित केले आहे.

Baramati, Rahuri Byelection : बिनविरोधचा प्रयत्न फसला; दोन नव्या मित्रांसह काँग्रेसची ‘एन्ट्री’, आता काँटे की टक्कर?

Baramati, Rahuri Byelection Latest Update : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या दोन्ही जागा बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू असतानाच, काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेऊन सर्वांना चकित केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागांवर आता राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

काँग्रेसचे नवे समीकरण: 'वंचित' आणि 'रासप'ची एन्ट्री
या पोटनिवडणुकीत काँग्रेसने एक मोठी खेळी खेळली आहे. दिल्लीतील काँग्रेस हायकमांडने केवळ निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील दिला नाही, तर दोन नव्या मित्रपक्षांची साथही मिळवून दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांची 'वंचित बहुजन आघाडी' आणि महादेव जानकर यांचा 'राष्ट्रीय समाज पक्ष' (रासप) आता काँग्रेससोबत मैदानात उतरणार आहेत. विशेषतः बारामती विधानसभा मतदारसंघात धनगर आणि दलित समाजाची लोकसंख्या मोठी असल्याने, काँग्रेस-रासप युतीचा उमेदवार महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

हेही वाचा – NCP Ajit Pawar : "त्या स्वतः त्यांच्या पद्धतीने" सुनेत्रा पवार आणि तटकरे-पटेल मतभेदावर राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील नेत्याचा मोठा खुलासा

बारामतीत सुनेत्रा पवारांसमोर काँग्रेसचे आव्हान
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विधीमंडळाचे सदस्य होण्यासाठी बारामतीची पोटनिवडणूक जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने या जागेवरून माघार घेत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत दिले होते, मात्र काँग्रेसने आता स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे. आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे बारामतीची निवडणूक आता केवळ औपचारिकता न राहता अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

राहुरीमध्ये तिरंगी लढतीची शक्यता
राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपने दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी शरद पवार गट प्राजक्त तनपुरे यांना 'अपक्ष' म्हणून ताकद देण्याच्या तयारीत आहे. मात्र, आता काँग्रेसनेही या जागेवर आपला दावा ठोकल्यामुळे राहुरीची लढत बहुकोणीय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आधीच पार पडल्या असून, महाविकास आघाडीतील एकजूट टिकणार की काँग्रेस स्वतंत्र लढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Sunetra Pawar Meet Praful Patel-Sunil Tatkare: राष्ट्रवादीत धुसफूस? सुनेत्रा पवारांनी घेतली पटेल-तटकरेंची नवी दिल्लीत भेट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number