Baramati ByElection: बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणूक; मतदानाला सुरूवात, काय आहे सध्या स्थिती अन् मतदारराजा कोणाला निवडणार?

या पोटनिवडणुकीत महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Baramati ByElection: बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणूक; मतदानाला सुरूवात, काय आहे सध्या स्थिती अन् मतदारराजा कोणाला निवडणार?

जानेवारी महिन्यात अजित पवारांचे विमान अपघातात दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली जात आहे. या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीत महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात आला. काँग्रेसच्या वतीने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे महायुतीला मोठा दिलासा मिळाला. मात्र काही अपक्ष उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यानं ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. या निवडणुकीत एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. 

राहुरीमध्येही मोठी लढत
अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे. यासाठी एकूण 374 मतदान केंद्रे आहेत तर एकूण मतदारसंख्या 3 लाख 33 हजार 543 इतकी असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे 2 हजार 180 अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात असेल. 

भाजपचे उमेदवार अक्षय कार्डीले  आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके आणि इतर अपक्ष तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेवटपर्यंत आपली भूमिका स्पष्ट न केल्याने त्यांचे समर्थक नेमकी कोणाला पाठींबा देणार हे पाहणं महत्वाचे राहणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number