Baramati Byelection : बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या भूमिकेमुळे पेच; निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शरद पवार मैदानात?

एकीकडे शरद पवार गट बारामती निवडणुकीतून माघार घेत असताना, दुसरीकडे काँग्रेसने मात्र आपली निवडणुकीत उतरण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे.

Baramati Byelection : बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या भूमिकेमुळे पेच; निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शरद पवार मैदानात?

Maharashtra assembly bypoll 2026 : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर निवडणूक होत असून, महायुतीच्या नेत्यांनी ही जागा बिनविरोध करण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यापूर्वीच बारामतीमध्ये उमेदवार देणार नसल्याची घोषणा केली आहे.

काँग्रेसचा स्वबळाचा पवित्रा आणि महाविकास आघाडीत पेच
एकीकडे शरद पवार गट निवडणुकीतून माघार घेत असताना, दुसरीकडे काँग्रेसने मात्र आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी संकेत दिले आहेत की, जर ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याची असूनही शरद पवार गट उमेदवार देणार नसेल, तर काँग्रेस तिथे आपला उमेदवार रिंगणात उतरवेल. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे. 1 एप्रिल ते 2 एप्रिल दरम्यान झालेल्या राजकीय घडामोडींनंतर, काँग्रेस आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे, ज्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर होताना दिसत आहे.

हेही वाचा – Satara Zilla Parishad Election: साताऱ्यात पुन्हा राजकीय रणकंदन! काळ्या फिती अन् जोरदार घोषणाबाजी; भाजपविरुद्ध विरोधक एकवटले

सुनेत्रा पवारांची उद्धव ठाकरेंना विनंती
सुनेत्रा पवार यांनी नुकताच दोन दिवसांचा दिल्ली दौरा पूर्ण केला असून, मुंबईत परतल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासाठी सुनेत्रा पवारांनी ठाकरेंकडे पाठिंबा मागितला आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी यावर थेट निर्णय न देता, महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशी आणि बारामतीतील स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. या निर्णयावर आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

संजय राऊत यांनी मांडली भूमिका; काय असेल आगामी रणनीती?
शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, बारामती पोटनिवडणुकीबाबतचा अधिकृत निर्णय उद्धव ठाकरे स्वतः घेतील. काँग्रेस हा देशातील मोठा पक्ष असून, जर ते उमेदवार देणार असतील, तर शिवसेनेचा त्याला कोणताही आक्षेप नसेल. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवार न देणे, हा त्यांचा कौटुंबिक किंवा पक्षांतर्गत प्रश्न असू शकतो, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी या निवडणुकीत एकमुखाने उतरणार की काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा मिळणार, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल.

हेही वाचा – NCP Sunetra Pawar Letter : पत्राचा पेच! निवडणूक आयोगाल दिलेल्या पत्रामुळे पार्थ पवारांची राज्यसभेची खासदारकी अडचणीत?; सुनेत्रा पवार पत्र मागे घेणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number