Kirit Somaiya on Bakri Eid: ‘बकरी ईदला निवासी वस्त्यांमधील कुर्बानीवर बंदी घाला…; किरीट सोमय्यांची महापौरांकडे पत्राद्वारे कठोर कारवाईची मागणी

भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भेट घेऊन रहिवासी भागात होणाऱ्या नियमबाह्य कत्तलींवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Kirit Somaiya on Bakri Eid: ‘बकरी ईदला निवासी वस्त्यांमधील कुर्बानीवर बंदी घाला…; किरीट सोमय्यांची महापौरांकडे पत्राद्वारे कठोर कारवाईची मागणी

Kirit Somaiya on Bakri Eid:  आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सोसायट्या, चाळी आणि खुल्या मैदानांमध्ये होणाऱ्या बकऱ्यांच्या कुर्बानीवरून आता राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भेट घेऊन रहिवासी भागात होणाऱ्या नियमबाह्य कत्तलींवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. सोमय्या यांनी या संदर्भात महापौरांना एक पत्र दिले असून, नागरी वस्त्यांमध्ये उघड्यावर होणाऱ्या कत्तली कायद्याचे उल्लंघन असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याची विनंती
किरीट सोमय्या यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, मुंबईतील कोणत्याही रहिवासी वस्तीजवळ किंवा उघड्यावर प्राण्यांची कत्तल करणे कायद्याने निषिद्ध आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसते. महापालिका आयुक्त आणि विभागीय अधिकाऱ्यांनी याबाबत कडक पावले उचलून न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सार्वजनिक स्वच्छता आणि नागरी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळीच खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Amit Thackeray: ‘हा व्यवस्थेने केलेला नरसंहार…’; NEET पेपरफुटीवरून अमित ठाकरेंचा केंद्र आणि NTA वर विखारी हल्ला

BMC ची जय्यत तयारी; 109 अधिकृत जागा निश्चित
यंदा बकरी ईद 27 May 2026 रोजी साजरी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. कुर्बानीसाठी प्रशासनाने शहरात एकूण 109 ठिकाणांना अधिकृत परवानगी दिली आहे. तसेच 17 मे ते 30 मे दरम्यान देवनार येथे जनावरांचा मोठा बाजार भरवण्यात येणार आहे. या ठिकाणी CCTV निगराणी, सुरक्षा रक्षक, फूड कोर्ट आणि आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

हायटेक सुविधा आणि चोख सुरक्षा व्यवस्था
प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी पालिकेने प्रथमच ‘MyBMC Mobile App’ द्वारे ऑनलाइन परवानगी आणि स्लॉट बुकिंगची सोय उपलब्ध करून दिली आहे. प्राण्यांच्या पडताळणीसाठी QR Code प्रणालीचा वापर केला जाणार आहे. सणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी शहरात 500 हून अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. तसेच 24 तास कार्यरत राहणारे विशेष कंट्रोल रूमही उभारण्यात आले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number