Bacchu Kadu : मोठी घोषणा! एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार, पक्ष करणार विलीन; बच्चू कडूंनी केलं क्लिअर

गेल्या काही काळापासून महायुतीमध्ये नाराजीचे सूर आळवणारे बच्चू कडू आता शिवसेनेच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी जय महाराष्ट्रशी संवाद साधला.

Bacchu Kadu : मोठी घोषणा! एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार, पक्ष करणार विलीन; बच्चू कडूंनी केलं क्लिअर

Bacchu Kadu Shiv Sena Entry : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची भूमिका केंद्रस्थानी आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली असली, तरी त्यासाठी ‘प्रहार’ संघटना शिवसेनेत विलीन करण्याची अट घातल्याची जोरदार चर्चा आहे. या संदर्भात बोलताना बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, ‘प्रहार सामाजिक संघटना कायम राहील, प्रहार दिव्यांग संघटना कायम राहील ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी शिवसेनेत यावं’.

राजकीय पुनर्वसन की विलीनीकरणाचा दबाव?
गेल्या काही काळापासून महायुतीमध्ये नाराजीचे सूर आळवणारे बच्चू कडू आता शिवसेनेच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 29 एप्रिल 2026 रोजी कडू आणि शिंदे यांच्यात प्राथमिक चर्चा झाली असून, कडू यांनी आपले ‘इरादे’ स्पष्ट केले आहेत. “मी सध्या तरी ‘प्रहार’चाच पाईक आहे, मात्र मातीतील संघटना म्हणून शिवसेनेसोबत जाण्यास माझी हरकत नाही,” असं विधान त्यांनी केलं. शिवसेनेतील काही मंत्री आणि नेत्यांनी मात्र बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी देण्यापेक्षा पक्षातील निष्ठावंतांना संधी देण्याची मागणी केल्यामुळे या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोधाचाही सामना करावा लागत आहे.

हेही वाचा – Bacchu Kadu Vidhan Parishad : बच्चू कडूंना विधानपरिषदेची उमेदवारी, ‘प्रहार’ पक्ष शिवसेनेत विलीन होणार?

अंतिम निर्णयाची प्रतीक्षा
विधान परिषद निवडणुकीसाठी 12 मे 2026 रोजी मतदान होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. बच्चू कडू यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही, परंतु जर मुख्यमंत्री त्यांच्या सामाजिक मागण्या मान्य करणार असतील, तर ते शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेऊ शकतात. 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बच्चू कडू यांच्यासाठी हे राजकीय पुनर्वसन महत्त्वाचे मानले जात आहे. आता ही नवी राजकीय युती प्रत्यक्षात उतरते की ‘प्रहार’ आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number