Atul Chavan Resignation: भाजप आमदाराचे पती अतुल चव्हाण यांचा PWD मुख्य अभियंतापदाचा तडकाफडकी राजीनामा; काय आहे नेमकं प्रकरण?

सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) मराठवाडा प्रादेशिक मुख्य अभियंता आणि भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती अतुल चव्हाण यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला आहे.

Atul Chavan Resignation: भाजप आमदाराचे पती अतुल चव्हाण यांचा PWD मुख्य अभियंतापदाचा तडकाफडकी राजीनामा; काय आहे नेमकं प्रकरण?

Atul Chavan Resignation:  सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) मराठवाडा प्रादेशिक मुख्य अभियंता आणि भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती अतुल चव्हाण यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. 31 जुलै रोजी त्यांनी विभागाच्या सचिवांकडे आपला राजीनामा सोपवला. या निर्णयापाठोपाठ त्यांनी व्हॉट्सॲप प्रोफाईलवर "अंत नहीं, यह एक नई शुरुआत है…" अशी सूचक ओळ लिहिल्याने त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पदोन्नतीने सचिव पदावर जाण्यासाठी सर्व अर्हता पूर्ण असूनही त्यांची फाईल वरिष्ठ स्तरावर प्रदीर्घ काळापासून प्रलंबित राहिली. या प्रशासकीय दुर्लक्षामुळे हवालदिल होऊन त्यांनी हा टोकाचा मार्ग निवडल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक पाहता, मार्च 2030 मध्ये ते निवृत्त होणार होते; परंतु 4 वर्षे शिल्लक असतानाच त्यांनी सेवेचा तडकाफडकी त्याग केला.

32 वर्षांची दीर्घ कारकीर्द अन् महत्त्वाच्या प्रकल्पांतील योगदान
अतुल चव्हाण यांनी 16 ऑगस्ट 1994 रोजी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला होता. गेल्या 32 वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली. समृद्धी महामार्ग, अष्टविनायक मार्ग सुधारणा, विद्यापीठांमधील आधुनिक डिजिटल स्टुडिओ आणि कोल्हापूर येथील खंडपीठाच्या (सर्किट बेंच) इमारतीचे बांधकाम यांसारख्या भव्य प्रकल्पांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवेची नोंद घेऊन 2010 मध्ये शासनाने त्यांना 'उत्कृष्ट अभियंता' पुरस्काराने सन्मानित केले होते.

मुंबईतील बदलीच्या दिवशीच सेवेला रामराम; नव्या चर्चांना उधाण
शासनाने काही महिन्यांपूर्वीच त्यांची मुंबईतील वरळी येथील नगर परिषद प्रशासन संचालनालयात मुख्य अभियंता म्हणून पदोन्नतीवर बदली केली होती. 31 जुलै रोजी त्यांना नव्या पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्याच दिवशी त्यांनी नवीन जबाबदारी स्वीकारण्याऐवजी थेट राजीनामा सादर केल्याने प्रशासकीय आणि राजकीय गोटात विविध चर्चांना उधाण आले आहे. आता ते राजकारणात सक्रिय होणार की नवी इनिंग सुरू करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Siddhivinayak Trust : दरवर्षी 18 कोटींची चोरी! सिद्धिविनायक मंदिरावर गंभीर आरोप; आता ट्रस्टचं राज ठाकरेंना थेट उत्तर

प्रशासकीय नाराजी की नव्या राजकीय प्रवासाची नांदी?
शासकीय सेवेत प्रदीर्घ अनुभव असलेल्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने वेळेआधीच घेतलेली ही निवृत्ती प्रशासनातील अंतर्गत ताणतणाव आणि राजकीय दबावाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा ऐरणीवर घेऊन आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number