New ITR Forms: करदात्यांनो लक्ष द्या! ITR फॉर्ममध्ये मोठे बदल; 31 जुलैपूर्वी ‘हे’ नवीन नियम जाणून घ्या, अन्यथा…

नवीन अर्जामध्ये सर्वात मोठा बदल संपर्क तपशीलात करण्यात आला असून यामुळे करदात्यांची सुरक्षितता वाढणार आहे.

New ITR Forms: करदात्यांनो लक्ष द्या! ITR फॉर्ममध्ये मोठे बदल; 31 जुलैपूर्वी ‘हे’ नवीन नियम जाणून घ्या, अन्यथा…

New ITR Forms:  प्राप्तिकर विभागाने आर्थिक वर्ष 2025-26 (निर्धारण वर्ष 2026-27) साठीच्या प्राप्तिकर परतावा (ITR) फॉर्ममध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. 31 जुलै 2026 ही परतावा भरण्याची अंतिम मुदत असून, फॉर्ममधील तांत्रिक बदल न समजून घेता अर्ज भरल्यास तो फेटाळला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे करदात्यांनी नवीन नियमांची वेळीच दखल घेणे आणि त्यानुसार आपली कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे.

संपर्कासाठी आता 'डबल' सुरक्षितता: दोन पत्ते आणि दोन नंबर बंधनकारक
नवीन अर्जामध्ये सर्वात मोठा बदल संपर्क तपशीलात करण्यात आला असून यामुळे करदात्यांची सुरक्षितता वाढणार आहे. आता करदात्यांना केवळ एक नाही, तर दोन महत्त्वाचे तपशील द्यावे लागतील. प्राथमिक पत्त्यासोबतच एक 'दुय्यम पत्ता' (Secondary Address) देणे आता बंधनकारक असेल, जे परदेशात किंवा शहराबाहेर राहणाऱ्या लोकांसाठी सोयीचे ठरेल. तसेच, संपर्क अधिक सुलभ व्हावा यासाठी आता प्राथमिक आणि दुय्यम असे दोन मोबाईल नंबर आणि दोन ईमेल आयडी विचारले जातील, जेणेकरून एक नंबर बंद असल्यास विभागाला दुसऱ्या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

गुंतवणुकीवर कर सवलतीची सुवर्णसंधी
निर्धारण वर्ष 2026-27 साठी फॉर्म भरताना आर्थिक वर्ष 2025-26 मधील गुंतवणुकीचा विचार करणे गरजेचे आहे. फॉर्ममध्ये अचूक माहिती भरल्यास करदात्यांना LIC आणि PPF, गृहकर्जाचे व्याज किंवा मुद्दल, तसेच वैद्यकीय विमा (Health Insurance) यांसारख्या गुंतवणुकीवर भरघोस कर सवलत मिळू शकते. यामुळे करदायित्व कमी होऊन आर्थिक बचत होण्यास मदत होईल.

तांत्रिक प्रक्रिया झाली सोपी; करदात्यांना मोठा दिलासा
प्राप्तिकर विभागाने करदात्यांचा तांत्रिक गोंधळ कमी करण्यासाठी काही नियमांत शिथिलता दिली आहे. पूर्वी प्रतिनिधीची सविस्तर माहिती द्यावी लागत असे, आता केवळ नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर पुरेसा आहे. तसेच, वर्षाच्या मध्यात टॅक्स दर बदलल्यास पूर्वी नफा वेगवेगळ्या कालखंडात दाखवावा लागायचा, आता केवळ 'एकूण नफा' दाखवण्याची सोय करण्यात आली आहे. शेअर बाजार आणि मालमत्ता विक्रीतून झालेला नफा भरताना आता तारखेनुसार क्लिष्ट तांत्रिक माहिती देण्याची गरजही कमी करण्यात आली आहे.

हेही वाचा – Income Tax Return 2026: उत्पन्न शून्य असले तरी ITR का भरावा? जाणून घ्या 5 महत्त्वाचे फायदे

31 जुलै पूर्वी करा तयारी; विनाविलंब परतावा भरा
आयटीआर दाखल करणे ही केवळ कायदेशीर गरज नसून ते भविष्यात कर्ज मिळवण्यासाठी किंवा आर्थिक पत सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे आहे. बदलांनुसार अचूक फॉर्म भरल्यास परतावा मिळण्याची प्रक्रिया जलद होते. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी म्हणजेच 31 जुलै 2026 पर्यंत आपला परतावा दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वेळेत परतावा भरल्यास दंड आणि तांत्रिक अडचणींपासून करदात्यांचे संरक्षण होईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number