CM Vijay OSD: ज्योतिषी राधन पंडित यांची मुख्यमंत्री विजय यांचा ‘OSD’ म्हणून नियुक्ती; त्यांच्या एका सल्ल्याने कशी फिरली सत्तेची चक्रे? वाचा

ज्योतिषी रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांची मुख्यमंत्र्यांचे 'विशेष कर्तव्य अधिकारी' (Officer on Special Duty - OSD) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

CM Vijay OSD: ज्योतिषी राधन पंडित यांची मुख्यमंत्री विजय यांचा ‘OSD’ म्हणून नियुक्ती; त्यांच्या एका सल्ल्याने कशी फिरली सत्तेची चक्रे? वाचा

CM Vijay OSD: तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि 'TVK' पक्षाचे प्रमुख विजय यांनी प्रशासकीय स्तरावर एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांचे वैयक्तिक ज्योतिषी रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांची मुख्यमंत्र्यांचे 'विशेष कर्तव्य अधिकारी' (Officer on Special Duty – OSD) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तामिळनाडू सरकारने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला असून, त्यांची नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. या नियुक्तीशी संबंधित अटी आणि शर्ती लवकरच स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

विजयाची भविष्यवाणी ठरली खरी; आता प्रशासनात मोठी जबाबदारी
राधन पंडित वेट्रिवेल हे तेच ज्योतिषी आहेत, ज्यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या बरेच आधी विजय आणि त्यांच्या पक्षाच्या (तामिझगा वेट्री कझगम – TVK) दणदणीत विजयाची भविष्यवाणी केली होती. निवडणुकीच्या निकालांनंतर ही भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरल्याने त्यांची सर्वत्र चर्चा झाली. आता त्यांना थेट मुख्यमंत्र्यांचे 'विशेष कर्तव्य अधिकारी' हे महत्त्वाचे पद देऊन सरकारने त्यांच्यावर मोठा विश्वास दर्शवला आहे. अनेक बड्या नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध आणि राजकीय निर्णयांवरील त्यांचा प्रभाव यामुळे ही नियुक्ती विशेष मानली जात आहे.

हेही वाचा – Rahul Gandhi Instagram Post: …अन् अवघ्या काही वेळातच इन्स्टाग्रामकडून राहुल गांधी आणि ‘थलपती’ विजय यांची 'ती' पोस्ट ब्लॉक; काँग्रेसकडून मोठा दावा

शपथविधीची वेळ बदलण्याचा दिला होता सल्ला
तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करताना विजय यांनी अनेक आव्हानांचा सामना केला. सुरुवातीला शपथविधी सोहळा 10 मे रोजी दुपारी 3:45 वाजता होणार होता. मात्र, राधन पंडित यांच्या सल्ल्यानुसार ही वेळ बदलून सकाळी 10:00 वाजता करण्यात आली होती. विजय यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात वेट्रिवेल यांनी सातत्याने सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता अधिकृतपणे प्रशासकीय पद मिळाल्यामुळे त्यांचे राजकीय वजन अधिकच वाढले आहे.

जयललितांपासून ते विजयपर्यंत; अनेक दिग्गजांचे सल्लागार
राधन पंडित यांना तामिळनाडूतील एक प्रभावशाली आध्यात्मिक गुरु आणि ज्योतिषी मानले जाते. केवळ मुख्यमंत्री विजयच नव्हे, तर राज्याच्या राजकारणातील अनेक दिग्गज व्यक्तींनी त्यांचा सल्ला घेतला आहे. असे म्हटले जाते की, माजी मुख्यमंत्री जयललिता या देखील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी राधन पंडित यांच्याशी चर्चा करत असतं. ज्योतिष क्षेत्रात 40 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले राधन पंडित आता थेट सरकारी यंत्रणेचा भाग झाल्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number