Asia Cup Trophy Row: ‘मी BCCI कडे माफी मागितली नाही…’; मोहसीन नक्वी यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला फुटलं तोंड

नक्वी यांनी स्पष्ट केले की, ‘मी कधीही बीसीसीआयकडे माफी मागितली नाही आणि मी कधीही माफी मागणार नाही.’

Asia Cup Trophy Row: ‘मी BCCI कडे माफी मागितली नाही…’;   मोहसीन नक्वी यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला फुटलं तोंड

Asia Cup Trophy Row: आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघाच्या विजयानंतर ट्रॉफीविषयी निर्माण झालेल्या वादास आता पीसीबी प्रमुख आणि एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी नवीन वळण दिले आहे. 28 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय संघाने पाकिस्तानला 5 गडी राखून पराभूत करून आशिया कप विजेतेपद पटकावले. मात्र विजयानंतर ट्रॉफीच्या ताब्यात वाद निर्माण झाला, ज्याचा उलगडा अजूनही सुरू आहे. नक्वी यांनी स्पष्ट केले की, ‘मी कधीही बीसीसीआयकडे माफी मागितली नाही आणि मी कधीही माफी मागणार नाही.’ त्यांनी हे विधान सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रसिद्ध केले आणि भारतीय माध्यमांवर टीका केली, की ते अफवा पसरवतात. 

नक्वींवर ट्रॉफी चोरीचा आरोप

अंतिम सामन्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी मोहसीनकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. एसीसीचे अध्यक्ष असलेल्या नक्वींना स्टेजवर थांबावे लागले, पण भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, त्यामुळे नक्वी स्टेजवरून खाली आले आणि ट्रॉफी व विजेते पदक हॉटेलमध्ये नेले. यानंतर बीसीसीआयने नक्वींवर ट्रॉफी चोरीचा आरोप केला. तसेच ट्रॉफी परत न केल्यास आयसीसीकडे तक्रार करण्याची धमकी दिली.

हेही वाचा – Mohsin Naqvi Trophy Controversy : 'ट्रॉफी चोरी'ची तक्रार करण्याच्या इशाऱ्याने नक्वी वठणीवर; पण बैठकीत काय-काय घडलं?

दरम्यान, मोहसीन नक्वी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी आशिया कप ट्रॉफी भारताला परत करण्यास नकार दिला. त्यांनी सूर्यकुमार यादव यांना स्वतः यूएईतील एसीसी कार्यालयात जाऊन ट्रॉफी स्वीकारण्याची सूचना दिली. त्यानंतर लाहोरकडे जाण्यापूर्वी त्यांनी आशिया कप ट्रॉफी यूएई क्रिकेट बोर्डाला सोपवली, ज्याचा अर्थ ट्रॉफी आता यूएई बोर्डाच्या ताब्यात आहे. 

हेही वाचा – Asia Cup 2025 Trophy: भारताचा पाकिस्तानवर मोठा विजय! अखेर मोहसिन नक्वी यांनी आशिया कप ट्रॉफी UAE क्रिकेट बोर्डाकडे सोपवली

या घटनेमुळे आशिया कप ट्रॉफी वाद आणखी तीव्र झाला आहे. तसेच दोन्ही क्रिकेट बोर्डांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. मोहसीन नक्वींच्या स्पष्ट विधानामुळे हा वाद अजूनही चर्चेचा विषय बनलेला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number