Ashok Kharat Case: अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी; अंजली दमानिया म्हणाल्या, ‘खरातला जामीन मिळणे अशक्य’

अशोक खरात प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, अशोक खरातला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळणे शक्य नाही.

Ashok Kharat Case: अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी; अंजली दमानिया म्हणाल्या, ‘खरातला जामीन मिळणे अशक्य’

Ashok Kharat Case: महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीच्या गंभीर आरोपांखाली अटकेत असलेला भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणींत अधिकच वाढ झाली आहे. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर खरातला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला 29 मार्चपर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावली आहे.

न्यायालयात काय घडले?
सरकारी पक्षाने युक्तिवाद करताना सांगितले की, या प्रकरणाचे धागेदोरे खूप खोलवर असून तपासासाठी आरोपीची अधिक चौकशी करणे आवश्यक आहे. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने कोठडीत वाढ केली. खरातला न्यायालयात आणण्यापूर्वी त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य आणि लोकांचा संताप पाहता कोर्ट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. या हाय-प्रोफाईल प्रकरणाची सुनावणी ऐकण्यासाठी वकील आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा – Ashok Kharat Case : पहिल्याच सुनावणीत धक्कादायक खुलासे! हरणाची शिकार, वाघ-सापाचा वापर, 5 नरबळी?, 21 जीवंत..

अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा
या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “अशोक खरातला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळणे शक्य नाही, कारण हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. माझ्याकडे या संदर्भात काही लोक अधिक धक्कादायक माहिती घेऊन येत आहेत. आज रात्री मला यासंदर्भात अधिक माहिती मिळणार आहे.” दमानिया यांनी पुढे बोलताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि संबंधित यंत्रणेवरही निशाणा साधला. “या प्रकरणात रुपाली चाकणकर आणि अन्य संबंधितांवरही गुन्हे दाखल व्हायला हवेत,” अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number