SIT On Ashok Kharat Case : अशोक खरातची ‘पापकुंडली’ उघड! SIT प्रमुख IPS तेजस्वी सातपुते यांचा खरातप्रकरणी मोठा गौप्यस्फोट

SIT प्रमुख IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी खरातने विज्ञानाच्या नावाखाली आणि मृत्यूची भीती दाखवून महिलांचे कशाप्रकारे शोषण केले, याचे अंगावर शहारे आणणारे तपशील समोर मांडले आहेत.

SIT On Ashok Kharat Case : अशोक खरातची ‘पापकुंडली’ उघड! SIT प्रमुख IPS तेजस्वी सातपुते यांचा खरातप्रकरणी मोठा गौप्यस्फोट

SIT On Ashok Kharat Case : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू अशोक खरात याच्या अघोरी कृत्यांचा आणि लैंगिक शोषणाचा छडा लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाची (SIT) पहिली अधिकृत पत्रकार परिषद आज पार पडली. SIT प्रमुख IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी खरातने विज्ञानाच्या नावाखाली आणि मृत्यूची भीती दाखवून महिलांचे कशाप्रकारे शोषण केले, याचे अंगावर शहारे आणणारे तपशील समोर मांडले आहेत. या हाय-प्रोफाइल प्रकरणात आतापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल झाले असून तपासाचा विळखा अधिक घट्ट झाला आहे.

गुन्ह्यांचा पाढा: 12 गुन्हे आणि 24 अधिकाऱ्यांची ‘फौज’
अशोक खरातवर नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात 10 गुन्हे दाखल असून, त्यात 8 लैंगिक शोषण आणि 2 आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांचा समावेश आहे. याशिवाय अहिल्यानगरमधील शिर्डी आणि राहता येथे आर्थिक फसवणुकीचे 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली 2 पोलीस उपाधीक्षक, 3 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक निरीक्षक, 10 उपनिरीक्षक आणि 6 अंमलदार अशा एकूण 24 अनुभवी अधिकाऱ्यांची टीम दिवसरात्र काम करत आहे.

अंधश्रद्धा आणि मृत्यूची भीती दाखवून शोषण
तपासादरम्यान 30 हून अधिक साक्षीदारांच्या जबानीतून खरातची धक्कादायक कार्यपद्धती स्पष्ट झाली आहे. स्वतःकडे अद्भुत दैवी शक्ती असल्याचे भासवून खरात महिलांच्या कुटुंबावर मृत्यूचे सावट असल्याचे सांगून त्यांना घाबरवायचा. खडे, रुद्राक्ष आणि विधींच्या नावाखाली त्याने केवळ पैसेच उकळले नाहीत, तर बदनामीची भीती दाखवून अनेक महिलांवर लैंगिक अत्याचारही केले. ईशानेश्वर मंदिर परिसरात अंधाराचा फायदा घेऊन तो महिलांसोबत ‘हातचलाकी’चे प्रयोग करायचा, असेही तपासात समोर आले आहे.

हेही वाचा – Sathankulam Custodial Deaths Case Verdict : तुरुंगात पिता-पुत्राला अमानुष मारहाण, नऊ पोलिसांच्या छळामुळे झाला करुण अंत; सर्व आरोपी पोलिसांना मृत्युदंड

4,650 लिंक्स हटवल्या  
पीडित महिलांची ओळख जपण्यासाठी आणि त्यांचे व्हिडिओ सार्वजनिक होऊ नयेत यासाठी एसआयटीच्या सायबर टीमने मोठी कारवाई केली आहे. इंटरनेटवरून गुन्ह्याशी संबंधित 4,650 व्हिडिओ लिंक्स हटवण्यात आल्या असून, आक्षेपार्ह माहिती पसरवणारी 451 सोशल मीडिया अकाउंट्स कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहेत. पीडितांचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी सातपूर आणि कोपरगाव येथून 6 आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. उद्या खरातला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असून, एसआयटी अधिक पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number