Ashok Kharat Case: ‘अशोक खरात ही महाराष्ट्रातली एपस्टीन फाईल…’; अरविंद सावंत यांचा महायुती सरकारवर निशाणा

खासदार अरविंद सावंत यांनी सत्तेवर बसलेल्या नेत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Ashok Kharat Case: ‘अशोक खरात ही महाराष्ट्रातली एपस्टीन फाईल…’; अरविंद सावंत यांचा महायुती सरकारवर निशाणा

Ashok Kharat Case: अशोक खरात आणि वादग्रस्त पेनड्राईव्ह प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून राज्य सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. “अशोक खरात ही महाराष्ट्राची ‘एपस्टीन फाईल’ असून, या प्रकरणात अनेकांचे बुरखे फाटणार आहेत,” असा खळबळजनक दावा अरविंद सावंत यांनी केला आहे.

‘भोंदूगिरी आणि रक्ताचे राजकारण’
खासदार अरविंद सावंत यांनी सत्तेवर बसलेल्या नेत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतानाही काही लोक भोंदू बाबांच्या पाठीमागे लागून कृत्ये करत आहेत. कुणी रेड्याला मारले, तर कुणी त्याचे रक्त वाहिले; अशा प्रकारची भोंदूगिरी करून तुम्ही सत्तेवर बसला आहात. या सर्व प्रकारामुळे महाराष्ट्र कलंकित झाला असून, ही एक प्रकारे महाराष्ट्राची ‘एपस्टीन फाईल’च आहे.”

‘खरातबरोबर अनेकांची वरात निघणार’
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले आहे. “आता जे काही समोर येत आहे, ते पाहता ‘काय माझा महाराष्ट्र’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. अशोक खरात याच्यासोबत आता अनेकांची ‘वरात’ निघणार आहे,” असा इशारा त्यांनी दिला. या प्रकरणामुळे अनेक बड्या नेत्यांचे चेहरे समोर येतील, असे संकेत त्यांनी आपल्या वक्तव्यातून दिले आहेत.

भाजपवर निशाणा: ‘महाराष्ट्र उध्वस्त करण्याचे षडयंत्र’
या सर्व गोंधळाला आणि भोंदूगिरीला भारतीय जनता पक्षच जबाबदार असल्याचे नेत्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात सध्या केवळ ‘बनवाबनवी’ सुरू असून जनतेला मूर्ख बनवण्याचे काम केले जात असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. भाजपच्या या राजकारणामुळे महाराष्ट्र उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Trupti Desai: ‘माझ्यामुळेच अशोक खरातसंबंधित पेनड्राईव्ह मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले…’; तृप्ती देसाईंचा ठोंबरे-पाटलांवर पलटवार

राजकीय वर्तुळात खळबळ
खरात प्रकरणातील पेनड्राईव्ह आणि त्यातील संभाव्य पुराव्यांच्या चर्चांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. विरोधकांनी या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘एपस्टीन फाईल’ची उपमा दिल्यामुळे हे प्रकरण आगामी काळात कायदेशीर आणि राजकीयदृष्ट्या अधिक गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number