Asha Bhosle Passed Away : भारतीय संगीत क्षेत्रातील दैदीप्यमान तारा निखळला; 20 भाषांत 11,000 हून अधिक गाणी, ‘गिनीज बुक’मध्ये नाव

आशा भोसले यांच्या नावावर अनेक जागतिक विक्रम आणि मानाचे पुरस्कार नोंदवलेले आहेत. त्यांच्या गायन कौशल्याने त्यांनी केवळ देशातच नव्हे, तर सातासमुद्रापार भारताचे नाव उज्ज्वल केले आहे.

Asha Bhosle Passed Away : भारतीय संगीत क्षेत्रातील दैदीप्यमान तारा निखळला; 20 भाषांत 11,000 हून अधिक गाणी, ‘गिनीज बुक’मध्ये नाव

Asha Bhosle Records and Guinness World Record : भारतीय संगीत क्षेत्रातील एक अढळ तारा, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. 11 एप्रिल रोजी प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे 12 एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची नात जनाई भोसले हिने दिलेल्या माहितीनुसार, छातीतील संसर्ग आणि थकवा यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपल्या सुमधुर आवाजाने जगभरातील चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या आशाताईंच्या निधनामुळे संगीत विश्वात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि जागतिक सन्मान
आशा भोसले यांच्या नावावर अनेक जागतिक विक्रम आणि मानाचे पुरस्कार नोंदवलेले आहेत. त्यांच्या गायन कौशल्याने त्यांनी केवळ देशातच नव्हे, तर सातासमुद्रापार भारताचे नाव उज्ज्वल केले.

– गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड: 2011 मध्ये सर्वाधिक स्टुडिओ रेकॉर्डिंगसाठी त्यांचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात आले. त्यांनी 20 हून अधिक भारतीय भाषांमध्ये 11,000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत.
– ग्रॅमी नामांकन: ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला गायिका होत्या. 2005 मध्ये त्यांना हा बहुमान मिळाला होता.
– गाण्यांमधील वैविध्य : कव्वाली, गझल, शास्त्रीय संगीत ते कॅबरे आणि डान्स नंबर्सपर्यंत सर्व प्रकारच्या गाण्यांवर त्यांनी आपली मोहोर उमटवली.

संघर्षातून घडलेली 'आशा'
आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. पंडित दीनानाथ मंगेशकर यांची तिसरी मुलगी आणि 'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर यांची धाकटी बहीण असूनही, त्यांना स्वबळावर आपला मार्ग शोधण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी त्यांनी 'चला चला नव बाल' या गाण्याने आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. मात्र, त्यांना खरी ओळख 16 व्या वर्षी 'रात की रानी' या चित्रपटातील सोलो गाण्यामुळे मिळाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक कमी बजेटच्या चित्रपटांसाठी गाणी गायली, परंतु जिद्दीच्या जोरावर त्यांनी यशाचे शिखर गाठले.

हेही वाचा – Asha Bhosle Passed Away : आशा भोसलेंचे हे 'शेवटचे गाणे' ठरते आहे संगीतप्रेमींचे आकर्षण! 'गोरिलाझ'सोबतच्या जुगलबंदीने तरुण पिढीला लावले वेड

स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा विडा
सुरुवातीच्या काळात आशाताईंचा आवाज त्यांच्या थोरल्या भगिनी लता मंगेशकर यांच्याशी मिळताजुळता होता. एका व्यक्तीने तर त्यांच्या आवाजाचा गोंधळ करून लतादीदींच्या गाण्याला आशाताईंचे गाणे समजले होते. या घटनेने आशाताईंना विचार करायला भाग पाडले. "जर मी दीदींसारखेच गात राहिले, तर माझी स्वतंत्र ओळख कधीच निर्माण होणार नाही," असे त्यांना वाटले. यातूनच त्यांनी स्वतःची शैली बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पाश्चात्य संगीत समजून घेण्यासाठी इंग्रजी चित्रपट पाहिले आणि कव्वाली, गझल गाण्यावर मेहनत घेतली. त्यांच्या या बदलामुळेच बॉलीवूडला एक वेगळा 'व्हॉईस' मिळाला.

विवाद आणि आर. डी. बर्मन यांच्याशी असलेले नाते
आशा भोसले यांनी गायलेली 'दम मारो दम' आणि 'पिया तू अब तो आजा' सारखी गाणी त्या काळात अतिशय धाडसी मानली गेली, ज्यामुळे काही वादही निर्माण झाले. आर. डी. बर्मन (पंचम दा) यांच्यासोबतची त्यांची जोडी ही वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही स्तरावर लोकप्रिय ठरली. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, 'पिया तू अब तो आजा' गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळी गीतकार मजरूह सुलतानपुरी चक्क स्टुडिओ सोडून गेले होते, कारण त्यांना स्वतः लिहिलेल्या काही शब्दांची लाज वाटत होती. मात्र, आपल्या ठसकेबाज आवाजाच्या जोरावर आशाताईंनी ही सर्व गाणी अजरामर केली.

हेही वाचा – Asha Bhosle: संगीताच्या दुनियेतील 'दम मारो दम'! आशा भोसले यांनी कशी मोडली परंपरेची चौकट? जाणून घ्या त्यांच्या कारकिर्दीतील सुवर्णक्ष

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number