Arvind Kejriwal Home Controversy : केजरीवालांच्या आलिशान घराचे फोटो दाखवताना भाजपची मोठी फजिती; चक्क Pinterest वरचे फोटो दाखवले!

परवेश वर्मा यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेले फोटो हे केजरीवालांच्या घराचे नसून ते इंटरनेटवरून चोरलेले असल्याचा खळबळजनक खुलासा आम आदमी पार्टीने केला आहे.

Arvind Kejriwal Home Controversy : केजरीवालांच्या आलिशान घराचे फोटो दाखवताना भाजपची मोठी फजिती; चक्क Pinterest वरचे फोटो दाखवले!

Arvind Kejriwal Home Photos Controversy : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 95, लोधी इस्टेट या नव्या निवासस्थानावरून राजधानीत राजकीय रणकंदन माजले आहे. भाजप नेते परवेश वर्मा यांनी एका पत्रकार परिषदेत काही फोटो सादर करत केजरीवाल यांनी आपले घर अत्यंत आलिशान पद्धतीने सजवल्याचा दावा केला. या घराला त्यांनी ‘शीशमहल 2’ असे संबोधत केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली. पूर्वीच्या शासकीय निवासस्थानाप्रमाणेच याही घरात महागड्या वस्तूंचा वापर करण्यात आल्याचा आरोप वर्मा यांनी केला होता, मात्र हे फोटो दाखवणेच आता भाजपच्या अंगलट आले आहे.

‘आप’चे फॅक्टचेक आणि आतिषींचे प्रत्युत्तर
परवेश वर्मा यांनी दाखवलेले फोटो हे केजरीवालांच्या घराचे नसून ते इंटरनेटवरून चोरलेले असल्याचा खळबळजनक खुलासा आम आदमी पार्टीने केला आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी यांनी सोशल मीडियावर या संदर्भात पुरावे सादर केले. परवेश वर्मांनी पत्रकार परिषदेत जे आलिशान खोल्यांचे फोटो दाखवले, ते प्रत्यक्षात ‘Pinterest’ या प्रसिद्ध फोटो शेअरिंग वेबसाईटवरून डाऊनलोड केलेले असल्याचे समोर आले आहे. आतिषी यांनी यावरून भाजपची खिल्ली उडवत, “खोटे आरोप करण्यासाठी भाजपकडे आता स्वतःचे फोटोही उरले नाहीत का?” असा सवाल उपस्थित केला आहे. 

हेही वाचा – Raghav Chadha : राघव चढ्ढा यांची लोकप्रियता घटली; भाजप प्रवेशाची घोषणा करताच लाखोंच्या संख्येने फॉलोअर्समध्ये घट

सोशल मीडियावर पुराव्यांची चर्चा
आम आदमी पार्टीने या दाव्याच्या पुष्टीसाठी अभिजित दिपके नावाच्या व्यक्तीची पोस्ट रीशेअर केली आहे, ज्यामध्ये मूळ पिंटरेस्टवरील फोटो आणि परवेश वर्मांनी दाखवलेले फोटो यांची तुलना करण्यात आली आहे. तसेच, या पोस्टमध्ये भाजपमधले लोक अगदीच अडाणी असल्याचा टोला लगावला आहे आणि किमान AI चा तरी वापर करायचा, असं म्हणत खिल्ली उडवली आहे.
95, लोधी इस्टेट हे घर सरकारकडून देण्यात आलेले साधे निवासस्थान असताना, त्याला राजवाड्यासारखे दाखवण्यासाठी भाजपने भलतेच फोटो निवडल्यामुळे दिल्ली भाजपची मोठी पंचाईत झाली आहे. या फॅक्टचेकमुळे भाजपच्या आरोपांमधील हवाच निघून गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून सोशल मीडियावर नेटकरी भाजपला ट्रोल करत आहेत.

राजकीय वादाचा नवा अंक
अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर त्यांच्या राहणीमानावर भाजपने वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यापूर्वीच्या ‘शीशमहल’ वादानंतर आता नव्या घरावरूनही असाच कलगीतुरा पाहायला मिळत आहे. मात्र, चुकीच्या पुराव्यांमुळे भाजपची विश्वासार्हता धोक्यात आली असल्याचे ‘आप’चे म्हणणे आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष ‘आप’ यांच्यातील हा वाद आता केवळ घरापुरता मर्यादित न राहता ‘पिंटरेस्टच्या फोटों’भोवती फिरताना दिसत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर रंगलेला हा कलगीतुरा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा – AAP Seeks Disqualification of Rebel MPs :’आप’ची 7 खासदारांविरुद्ध आरपारची लढाई! अपात्रतेसाठी उपराष्ट्रपतींकडे दाद मागणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number