Rishabh Pant Angry On Kuldeep: ‘तु घरी खेळतोयस का?’ गुवाहाटी कसोटीत ऋषभ पंतचा कुलदीपवर संताप

गोलंदाजी करताना वारंवार उशीर केल्यामुळे पंचांनी दोनदा इशारा दिल्यानंतर पंतने मैदानातच कुलदीपला जोरदार फटकारले. या प्रसंगाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.<br/>

Rishabh Pant Angry On Kuldeep: ‘तु घरी खेळतोयस का?’ गुवाहाटी कसोटीत ऋषभ पंतचा कुलदीपवर संताप

Rishabh Pant Angry On Kuldeep: गुवाहाटीत सुरू असलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंत आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांच्यातील मैदानावरील तणावाने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. गोलंदाजी करताना वारंवार उशीर केल्यामुळे पंचांनी दोनदा इशारा दिल्यानंतर पंतने मैदानातच कुलदीपला जोरदार फटकारले. या प्रसंगाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

तू घरी खेळतोयस काय?  

स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंत कुलदीपवर स्पष्ट नाराजी व्यक्त करताना दिसतो. ऋषभ पंत म्हणतो, “यार 30 सेकंदांचा टायमर आहे… तू घरी खेळत आहेस का? एक चेंडू लवकर टाक. तुला दोनदा इशारा मिळाला. कसोटी क्रिकेटची थट्टा करू नकोस. मला फील्ड करू दे, तू फक्त गोलंदाजी नीट कर. मी काल दिवसभर कष्ट केले. कुलदीपच्या खेळीमुळे  टीम इंडियावर दबाव वाढला असून, वेळेचे नियम पाळण्यात चूक झाली तर दंड टाळणे कठीण होणार आहे.

हेही वाचा – Smriti Mandhana: हळद लागली, नवरी सजली; स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाच्या हळदीचा धमाल व्हिडीओ समोर

ओव्हर-टाइम नियमाचे उल्लंघन  

कसोटी क्रिकेटनुसार, एका षटकानंतर पुढचे षटक जास्तीत जास्त 60 सेकंदांत सुरू होणे आवश्यक आहे. याचे उल्लंघन झाल्यास पंचांकडून इशारा दिला जातो. नियमाप्रमाणे, तिसऱ्या वेळेस नियम मोडल्यास टीम इंडियाला थेट 5 धावांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे पंतची चिडचिड पूर्णपणे समजण्यासारखी आहे.  

हेही वाचा – Smriti Mandhana Wedding: स्मृतीच्या मंधानाच्या लग्नात मोजक्यांनाच प्रवेश, दिग्गजांना प्रवेश नाही?

पंतची स्टम्पिंगने बाजी पलटली

मैदानावरचा राग जितका तीव्र, तितकीच पंतची कामगिरीही धारदार दिसली. दक्षिण आफ्रिकेच्या सेनुरन मुथुस्वामी–व्हेरेना जोडीने सातव्या विकेटसाठी 88 धावा जोडून भारतावर दबाव वाढवला.   
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number