West Bengal Politics: ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का; ‘या’ TMC खासदाराने दिला राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आधीच अडचणीत असलेल्या पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि TMC प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा निर्णय अत्यंत मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

West Bengal Politics: ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का; ‘या’ TMC खासदाराने दिला राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा

West Bengal Politics: पश्चिम बंगालच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) राज्यसभा खासदार आणि प्रसिद्ध टॉलीवूड अभिनेत्री कोयल मल्लिक यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आधीच अडचणीत असलेल्या पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि TMC प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा निर्णय अत्यंत मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर कोयल मल्लिक यांनी तात्काळ केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आले असून त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

संसदेच्या एकाही अधिवेशनाला नव्हती उपस्थिती

रुक्मिणी मल्लिक म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या कोयल मल्लिक यांना तृणमूल काँग्रेसने राजकीय रणनीतीचा भाग म्हणून उच्च सभागृहात पाठवले होते. पक्षाने 27 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर 16 मार्च 2026 रोजी झालेल्या निवडणुकीत विजयी होऊन त्यांनी 6 एप्रिल 2026 रोजी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून त्यांची निवड महत्त्वाची मानली जात असली, तरी खासदार झाल्यापासून त्या संसदेच्या एकाही अधिवेशनाला उपस्थित राहू शकल्या नव्हती. त्या सभागृहात सक्रिय होण्यापूर्वीच त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा – Banking Jobs: मोठी बातमी! 3 आघाडीच्या बँकांतून 7,700 हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात; 'या' कौशल्याशिवाय बँकेत नोकरीची संधी मिळणे कठीण

सत्ता गमावल्यानंतर TMC मधील संकट गडद

हा राजीनामा अशा वेळी आला आहे जेव्हा ममता बॅनर्जी यांचा पक्ष बंगालमध्ये मोठ्या राजकीय संकटाचा सामना करत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 15 वर्षांनंतर तृणमूल काँग्रेसला बंगालमधील आपली सत्ता गमवावी लागली आहे. या निवडणुकीत भाजप 208 जागा जिंकून पहिल्यांदाच राज्यात सत्तेवर आला, तर TMC ला केवळ 80 जागांवर समाधान मानावे लागले. या दारुण पराभवानंतर साधारण एका महिन्यात, म्हणजेच जून 2026 मध्ये पक्षात अंतर्गत बंडखोरी उसळली. पक्षाचे दोन गट पडल्याने आणि अनेक आमदार-खासदार ममता बॅनर्जी यांची साथ सोडून बाहेर पडल्याने तृणमूल काँग्रेससमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number