Anjali Damania : अंजली दमानियांच्या निशाण्यावर अजित पवार! "24 तासांत राजीनामा घ्या.. नाहीतर", फडणवीसांना थेट इशारा

पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने केवळ फ्रॉ़डचे केलाय, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणी त्या पुन्हा पुन्हा अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

Anjali Damania : अंजली दमानियांच्या निशाण्यावर अजित पवार!  &quot24 तासांत राजीनामा घ्या.. नाहीतर&quot, फडणवीसांना थेट इशारा

Anjali Damania Demands Resignation of Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ (Amedia) कंपनीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी, 26 नोव्हेंबर रोजी गंभीर आरोप केले आहेत. मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की, त्यांनी अजित पवारांचा उपमुख्यमंत्री आणि पुणे पालकमंत्री पदाचा राजीनामा पुढील 24 तासांच्या आत घ्यावा.

दमानिया यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले की, “पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने केवळ ‘फ्रॉड, फ्रॉड आणि फ्रॉडच’ (Fraud) केला आहे.” 6 नोव्हेंबर रोजी हा जमीन घोटाळा समोर आला होता, तेव्हापासून दमानिया या प्रकरणात लक्ष घालून आहेत. त्यांनी मागील आठवड्यात पुण्यातील मुंढवा येथील जमिनीची पाहणी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र, त्यांना अधिकाऱ्यांनी पाहणी करू दिली नव्हती.

पुरावे सादर करत केला मोठा खुलासा
दमानिया यांनी या घोटाळ्याचे पुरावे सादर करत खळबळजनक खुलासा केला. अमेडिया कंपनीने सुरुवातीला डेटा सेंटर (Data Center) सुरू करण्यासाठी ‘एलओआय’ (LOI – Letter of Intent) घेतले. जमिनीची खरेदी किंवा स्टॅम्प ड्युटीवर (Stamp Duty) सूट देण्याची मागणी कुठेही केली नव्हती. कंपनीच्या कागदपत्रांमध्ये त्यांनी 98 लाख रुपये गुंतवून डेटा सेंटर सुरू करत असल्याचे दर्शवले.

सर्वात मोठा फ्रॉड असा झाला की, शीतल तेजवानी नावावर असलेली 40 एकर जागा डेटा सेंटरसाठी 5 वर्षांसाठी लीजवर घेत असल्याचे दाखवून एलओआय मिळवले. यामुळे जी मोठी स्टॅम्प ड्युटी लागणार होती, ती चुकवून केवळ 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरली गेली, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा – Uddhav Thackeray On Sanjay Raut Health: संजय राऊत लवकरच पुन्हा मैदानात उतरतील; राऊतांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

जिल्हाधिकाऱ्यांवरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह
दमानिया यांनी 1800 कोटी रुपयांच्या या जमीन व्यवहारावरून प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांनी विचारले, “जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांनी जमिनीची विक्री झाल्याचे कळवले असताना, जूनपासून नोव्हेंबरपर्यंत 1800 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे पालकमंत्र्यांना (Guardian Minister) जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले नव्हते, असे होऊ शकते का?” केंद्रीय प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीचा ताबा घेण्यासाठी कोणी येत आहे, हे कळवण्यात आले होते, तरी पालकमंत्र्यांना याबाबत माहिती का दिली गेली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राजीनामा न घेतल्यास थेट अमित शाहांना भेटणार
दमानिया यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे “अगदी ताबडतोब” अजित पवारांचा राजीनामा घेण्याची विनंती केली आहे. 24 तासांत राजीनामा न घेतल्यास त्या दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. “ना खाऊंगा, ना खाने दुंगा” हे शाह यांचे आश्वासन आहे. महाराष्ट्रातील ‘भाई, दादा आणि भाऊ’ यांचे चाललेले घाण व्यवहार, लोकांच्या जमिनीची लूट आणि शेतकऱ्यांचे छळ थांबवावेत, अशी विनंती मी गृहमंत्री शहा यांना करणार आहे. जर त्यांनी भेट दिली नाही, तर मी भेट होईपर्यंत तिथे ठाण मांडून बसणार आहे, असा इशाराही दमानियांनी दिला आहे.

दमानिया यांनी या प्रकरणाची चौकशी करणारी विद्यमान एसआयटी (SIT) बरखास्त करून नवीन एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे. यामुळे मुख्यमंत्री फडणवीस पुढील 24 तासांमध्ये काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा – पीए अनंत गर्जेच्या पत्नीचा धक्कादायक मृत्यू, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; निवेदनात काय?
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number