Anil Parab: सोलापूरच्या जलसंधारण कामांमध्ये अनियमिततेचा गंभीर आरोप; अनिल परबांनी सभागृहात केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी

अनिल परब यांनी आपल्या लक्षवेधीमध्ये म्हटलं की, सोलापूरमध्ये तब्बल दोन हजार कोटी रुपयांचे जलसंधारण प्रकल्पच्या कंत्राट वाटप प्रक्रियेत दलालांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात झाला आहे.

Anil Parab: सोलापूरच्या जलसंधारण कामांमध्ये अनियमिततेचा गंभीर आरोप; अनिल परबांनी सभागृहात केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Anil Parab: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषद सदस्य अनिल परब यांनी सोलापूर जिल्ह्यातील जलसंधारण विभागातील कथित अनियमिततेचा मुद्दा सभागृहात मांडला. अनिल परब यांनी आपल्या लक्षवेधीमध्ये म्हटलं की, सोलापूरमध्ये तब्बल दोन हजार कोटी रुपयांचे जलसंधारण प्रकल्पच्या कंत्राट वाटप प्रक्रियेत दलालांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात झाला आहे. कामे कोणत्या निकषांवर दिली जातील. कामे कोणत्या व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येतील हे अनेकदा दलाल ठरवत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी अनिल परब यांनी केला.

दरम्यान, अनिल परब यांनी म्हटलं की, अर्थसंकल्पात जलसंधारण, पाझर तलाव दुरुस्तीच्या कामासाठी 2 हजार कोटींची कोटींची तरतूद आहे. पण फक्त 18 हजार कोटींच्या प्रमा दिल्या आहेत. तिकडे सुनील कुशीरे संचालक आहेत. त्याला असं वाटत की, सगळे आमदार, अधिकारी माझ्या खिशात आहेत. ते तिथं मनमानी कारभार करत आहेत. त्यांच्या खिसा तात्काळ बंद करण्याची गरज आहे, अशी मागणीही यावेळी अनिल परब यांनी केली. 

हेही वाचा – Mahendra Thorave On Viral Video : ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरून राजकारण तापलं; ‘हा आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न’, महेंद्र थोरवे यांचा दानवे-तटकरेंवर गंभीर आरोप

संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी    

अनिल परब यांनी सभागृहात सांगितले की, या कथित व्यवहारांमुळे विभागातील काही अधिकाऱ्यांकडे बीएमडब्ल्यू आणि ऑडीसारख्या महागड्या गाड्या दिसून येत आहेत, जे आर्थिक गैरव्यवहाराचे स्पष्ट संकेत आहेत. यावर उपाय म्हणून परब यांनी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली. तसेच, एका महिन्याच्या आत चौकशी अहवाल सरकारसमोर सादर करण्याचा आग्रह त्यांनी धरला.

हेही वाचा – Devendra Fadanvis : “लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसाव लागेल…”Ladki Bahin Yojana वरून सभागृहात गदारोळ; फडणवीसांचा थेट इशारा

या आरोपांना प्रतिसाद देताना, मंत्री संजय राठोड यांनी सांगितले की, विभागातील अनेक तक्रारींची चौकशी आधीच सुरू आहे. तसेच, एमडी सुनील कुशीरे यांची बदली करण्यात आलेली असून त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number