Eknath Shinde Meet Amit Shah : महाराष्ट्राचं राजकारण दिल्लीदरबारी; एकनाथ शिंदेंनी घेतली थेट अमित शाहांची भेट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जागावाटपावरून उफाळलेल्या असंतोषाने आता उघड स्वरूप धारण केले असून, मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या नाराजीचा स्फोट झाला.

Eknath Shinde Meet Amit Shah : महाराष्ट्राचं राजकारण दिल्लीदरबारी; एकनाथ शिंदेंनी घेतली थेट अमित शाहांची भेट

Eknath Shinde Meet Amit Shah: राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचे स्पष्ट संकेत पुन्हा एकदा दिसून येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जागावाटपावरून उफाळलेल्या असंतोषाने आता उघड स्वरूप धारण केले असून, मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या नाराजीचा स्फोट झाला. शिवसेना शिंदे गटातील सर्व मंत्री या बैठकीपासून दूर राहिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

हेही वाचा – Anjali Damania : पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ?; अंजली दमानियांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी

या बहिष्कारानंतरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महायुतीतील ताणतणावाविषयी कठोर भूमिका मांडली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असली तरी शिंदे गटाचे समाधान झालेले नाही. याच पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी विस्तृत चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जागावाटपावरून निर्माण झालेला तणाव आणि महायुतीतील समन्वयाचा प्रश्न हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता. या भेटीनंतर महायुतीतील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – Dharashiv Tuljapur : आरोपींसाठी भाजपची दारं उघडी! ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी नगराध्यक्षपदाचा उमेदवार

एकनाथ शिंदेंच्या नाराजीची कारणे 

एकनाथ शिंदेंच्या नाराजीची कारण पुढीलप्रमाणे आहेत. मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावं लागणं, आग्रहकरून सुद्दा गृहमंत्री पद न मिळणे, शिंदेच्या काही मंत्र्यांची प्रकरण बाहेर येणं, श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाची नोटीस, राजगडच्या पालकमंत्रीपदाचा न सुटलेला तिडा, शिंदेच्या मंत्र्याच्या खात्यांना निधी न मिळणे, तसेच स्थानिक निवडणुकांत शिंदे गटाच्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देणं आदी कारणांमुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे.   

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number