Navi Mumbai Crime : उमेदवाराच्या कारखाली लिंबू-मिरच्या अन् टाचण्या टोचलेली बाहुली…नवी मुंबईत मतदानापूर्वी जादूटोण्याचा प्रकार

मतदानाला अवघ्या काही तासांचा अवधी उरला असतानाच, नेरूळ प्रभाग क्रमांक 23 मधील शिंदे गटाचे उमेदवार दिलीप घोडेकर यांच्या गाडीखाली जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Navi Mumbai Crime : उमेदवाराच्या कारखाली लिंबू-मिरच्या अन् टाचण्या टोचलेली बाहुली…नवी मुंबईत मतदानापूर्वी जादूटोण्याचा प्रकार

Navi Mumbai Crime : महापालिका निवडणुकीच्या रणांगणात विजयासाठी उमेदवार कोणत्या थराला जाऊ शकतात, याचा प्रत्यय नेरूळमध्ये आला आहे. मतदानाला अवघ्या काही तासांचा अवधी उरला असतानाच, नेरूळ प्रभाग क्रमांक 23 मधील शिंदे गटाचे उमेदवार दिलीप घोडेकर यांच्या गाडीखाली जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अघोरी कृत्यामुळे संपूर्ण शहरात राजकीय तणावासोबतच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमका प्रकार काय?

प्रचाराची तोफ थंडावल्यानंतर उमेदवार वैयक्तिक भेटीगाठींवर भर देत असतानाच हा प्रकार समोर आला. उमेदवार दिलीप घोडेकर यांच्या कारखाली काही संशयास्पद वस्तू आढळल्या. जवळ जाऊन पाहिले असता तिथे लिंबू, मिरच्या, हळद-कुंकू पसरलेले होते.नसर्वात भयावह म्हणजे, तिथे एक ‘काळी बाहुली’ ठेवण्यात आली होती.नया बाहुलीवर उमेदवार घोडेकर यांचा फोटो लावून त्यावर टाचण्या टोचण्यात आल्या होत्या.

हेही वाचा – Sujay Vikhe-Patil : ‘कायदा जर कुणी हातात घेणार असेल तर आम्ही…’; सुजय विखे यांचा विरोधकांना कडक शब्दांत इशारा

विरोधकांवर संशयाची सुई

निवडणुकीच्या रिंगणात विकासकामांवर चर्चा होण्याऐवजी जादूटोण्याचा आधार घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दिलीप घोडेकर यांचा विजय निश्चित असल्याचे पाहून विरोधक हादरले आहेत. पराभवाच्या भीतीपोटीच त्यांनी अशा अघोरी प्रयोगाचा आधार घेतला आहे, असा आरोप घोडेकर यांच्या समर्थकांनी केला आहे.

हेही वाचा – Dhule Crime : धुळ्यात मतदानापूर्वी राडा, शिवसेना उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या घरावर हल्ला; भाजपवर गंभीर आरोप

दरम्यान, डिजिटल युगात अशा प्रकारच्या अंधश्रद्धेचा वापर झाल्याने मतदारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. भावी लोकप्रतिनिधी किंवा त्यांचे समर्थक जर अशा गोष्टींवर विश्वास ठेवत असतील, तर ते शहराचा विकास काय करणार? असा सवाल नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर ‘जादूटोणा विरोधी कायद्या’नुसार कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number