Amit Shah On Rahul Gandhi: घुसखोरांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून मतदान यात्रा काढली; अमित शाहांची राहुल गांधींवर टीका

अमित शाह यांनी अरारिया आणि समस्तीपूर येथे पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेवर टीका केली.

Amit Shah On Rahul Gandhi: घुसखोरांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून मतदान यात्रा काढली; अमित शाहांची राहुल गांधींवर टीका

Amit Shah On Rahul Gandhi: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी बिहारमधील समस्तीपूर आणि अरारियामध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत घुसखोरांना हाकलून लावण्यावर भर दिला. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेवर टीका करत आरोप केला की, ही यात्रा मतदारांच्या हक्कासाठी नव्हती, तर घुसखोरांना मतदानाचा अधिकार देऊन त्यांचे संरक्षण करण्यासाठी होती.

हेही वाचा – Kashmir Tourist Places Reopen: उपराज्यपालांचा मोठा निर्णय! जम्मू-काश्मीरमधील 'ही' 7 पर्यटन स्थळे पुन्हा सुरू होणार

आम्ही घुसखोरांना बाहेर काढू – 

अमित शाह यांनी म्हटलं की, 'राहुल आणि लालू यांच्यासाठी ही निवडणूक त्यांच्या पक्षाला विजयी करण्यासाठी आहे, पण एनडीएसाठी ही संपूर्ण बिहारमधून घुसखोरांना हाकलून लावण्याची लढाई आहे. भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळाले तर आम्ही या घुसखोरांना बाहेर काढू.' दरम्यान, अमित शाह यांनी या वेळी लालू यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की त्यांच्या राजवटीत बिहारमध्ये अनेक घोटाळे झाले. काँग्रेसने देशाची 12 लाख कोटींची फसवणूक केली, पण मोदी सरकार 11 वर्षांपासून सत्तेत असून विरोधक त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकलेले नाहीत. 

हेही वाचा – PM Modi Launches 4G Network : पंतप्रधान मोदींकडून BSNL चं स्वदेशी 4G नेटवर्क लोकार्पण; देशभरात 98 हजार टॉवर्स सुरू

दरम्यान, शाह यांनी एनडीएच्या कार्याची माहिती देताना कोसी लिंक प्रकल्प, पूर्णिया विमानतळ आणि माखाना बोर्डसारख्या प्रकल्पांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की कोसी लिंक प्रकल्प पूर्वी उद्ध्वस्त झालेल्या शेतांना पाणीपुरवठा करेल. यामुळे शेतकऱ्यांची समृद्धी वाढवेल. तथापी, अरारियातील फोर्ब्सगंज आणि समस्तीपूरमध्ये झालेल्या बैठकीत हजारो पक्ष कार्यकर्ते सहभागी झाले. शाह यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचे आवाहन केले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number