ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवारांवर संकट, राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर गुन्हे शाखेची कारवाई, अजित पवार म्हणाले, ‘पक्ष त्यांच्या पाठीशी…’

या आकस्मिक कारवाईमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, खुद्द अजित पवारांनी यावर अधिकृत भूमिका मांडली आहे.<br/>

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवारांवर संकट, राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर गुन्हे शाखेची कारवाई, अजित पवार म्हणाले, ‘पक्ष त्यांच्या पाठीशी…’

Naresh Arora : पुणे महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार थांबताच शहरात एका मोठ्या घडामोडीने राजकीय वातावरण तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या ‘डिझाइनबॉक्स्ड’ (DesignBoxed) या संस्थेच्या पुणे कार्यालयात गुन्हे शाखेचे (Crime Branch) अधिकारी तपासणीसाठी दाखल झाले. या आकस्मिक कारवाईमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, खुद्द अजित पवारांनी यावर अधिकृत भूमिका मांडली आहे.

कारवाई की चौकशी?

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला एका तक्रारीची माहिती मिळाली होती, ज्याची पडताळणी करण्यासाठी पथक अरोरा यांच्या कार्यालयात पोहोचले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी कार्यालयातील कामकाजाची पाहणी केली आणि कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. मात्र, तपासात काहीही संशयास्पद आढळले नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – BMC Election 2026 : मतदानादिवशी ठाकरे बंधूंचा ‘भगवा गार्ड’ मैदानात; 2 हजार जणांची नियुक्ती

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कार्यरत असलेले श्री. नरेश अरोरा व त्यांची संस्था ‘डिझाइनबॉक्स्ड’ यांच्या पुणे कार्यालयात आज क्राईम ब्रँचचे काही अधिकारी माहिती घेण्याच्या उद्देशाने उपस्थित झाले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रक्रियेदरम्यान आवश्यक ती माहिती देण्यात आली असून संपूर्ण सहकार्य करण्यात आले. या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्पष्ट करू इच्छितो की, या संपूर्ण विषयात पक्ष हा श्री. नरेश अरोड़ा व त्यांची संस्था ‘डिझाइनबॉक्स्ड’ यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायद्याचा सन्मान करतो आणि सर्व वैधानिक प्रक्रियांना सहकार्य करण्यावर विश्वास ठेवतो. या प्रकरणातही संबंधित यंत्रणांना आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करण्यात आले आहे. या विषयावर कोणताही संभ्रम, अफवा किंवा अनावश्यक नैरेटिव्ह पसरवू नये, असे आम्ही आवर्जून सांगू इच्छितो. तथ्यांच्या आधारेच कोणताही निष्कर्ष काढावा, हीच आमची भूमिका आहे.’ 

हेही वाचा – Tejaswini Pandit: ‘कुणालाही सरसकट मत देऊ नका!’ तेजस्विनी पंडितची इंस्टग्राम पोस्ट चर्चेत, मतदारांना थेट इशारा

नरेश अरोरा यांनी काय म्हटलं ?

डिझाइनबॉक्स्ड संस्थेचे प्रमुख नरेश अरोरा यांसंदर्भात माध्यमांशी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘आमच्याविरोधात कुणीतरी तक्रार केली होती. त्यानंतर काही अधिकारी कार्यालयात आले. त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना काही प्रश्न विचारले, त्यांची चौकशी केली. कार्यालयात नेमकं काय काम चालतं, असा प्रश्न अधिकाऱ्यांनी विचारला. आम्ही तपासाला पूर्णपणे सहकार्य करू,’ असंही नरेश अरोरा यांची म्हटलं आहे.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number