Akot Accident: अकोटमध्ये भीषण अपघात! प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराचा मृत्यू

राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या अकोट नगरपरिषदेतील महिला उमेदवार अलमास परवीन शेख सलीम यांचे रस्ते अपघातात निधन झाले आहे.

Akot Accident: अकोटमध्ये भीषण अपघात! प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराचा मृत्यू

Akot Accident: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून विविध पक्षांचे नेते, आमदार-खासदार प्रचारासाठी धावपळ करत आहेत. या पार्श्वभूमीवर अकोटमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या अकोट नगरपरिषदेतील महिला उमेदवार अलमास परवीन शेख सलीम यांचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा – Asim Sarode vs Suresh Dhas : बीडमध्ये हजार कोटींचा जमीन घोटाळा, भाजप आमदारावर गंभीर आरोप, खाडेंवर प्राणघातक हल्ला आता सरोदेंनाही भीती

अकोट नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 4 (ब) मधून राष्ट्रवादीने अलमास शेख सलीम यांना उमेदवारी दिली होती. उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्या प्रचारात सक्रिय होत्या. गुरुवारी त्या आपल्या पतींसह अमरावतीमधील तोंडगाव परिसरातून दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांच्या बाइकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अलमास शेख सलीम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

हेही वाचा – Marathwada Farmers Protest: मराठवाड्यात ऊसदर आंदोलन भडकले! कोयता बंदमुळे कारखाने ठप्प; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

अपघातात त्यांच्या पतींनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातानंतर धडक देणारा वाहनचालक पसार झाला आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला असून यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर तसेच उमेदवारांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून अकोट शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number