गेले बरेच दिवस राजकीय वर्तुळातील सत्तासंघर्षाने संपूर्ण राज्यभरात चांगलीच खळबळ माजवली होती. ११ मे रोजी यावर सर्वोच्च न्यायालयाने अखेरीस निर्णय दिला. परंतु, त्यानंतर पुन्हा एकदा राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. तर, सुषमा अंधारेंच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी चांगलाच पलटवार केला आहे.
सत्तासंघर्षाच्या निकालानंतर हिंदुविरोधी सुषमा अंधारे यांनी ‘दादा आमच्या हक्काचे आहेत. मी त्या कार्यकर्मात दादांच्या नावाचा उल्लेख केला नाही. सभागृहात माझ्या वतीने विरोधीपक्ष नेत्याने बोलावे. मग ते एकटे आहेत का? ती अपेक्षा सगळ्यांकडून आहे. दादा तुम्ही आम्हाला पारख करु नका’ असं वक्तव्य केलं. त्यावरच बोलत असताना ‘अंधारेंनी इकडे नाही, तर उद्धव ठाकरेंसमोर जाऊन रडावं’ असा पलटवार अजित पवार यांनी केला आहे.