Pune Election : थरारक पद्धतीने स्वागत; Ajit Pawar यांच्या प्रेमापोटी कार्यकर्ता थेट लटकला क्रेनला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करत रोडशोचे आयोजन केले होते. रॅलीदरम्यान मार्केट यार्ड परिसरामध्ये एका कट्टर कार्यकर्त्याने आपल्या अनोख्या पद्धतीने स्वागत केले.

Pune Election : थरारक पद्धतीने स्वागत; Ajit Pawar यांच्या प्रेमापोटी कार्यकर्ता थेट लटकला क्रेनला

Pune Mahapalika Election 2026 : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करत रोडशोचे आयोजन केले होते. या रॅलीदरम्यान मार्केट यार्ड परिसरामध्ये एका कट्टर कार्यकर्त्याने आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी जीवाची पर्वा न करता थेट क्रेनला लटकून हार अर्पण केला. या अनोख्या आणि चित्तथरारक स्वागताने खुद्द अजित पवारही काही काळ अवाक झाले.

नेत्याप्रती अलोट प्रेम आणि ‘क्रेन’ स्टंट
अजित पवारांच्या या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष करण गायकवाड यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रस्त्यावरील प्रचंड गर्दीतून नेत्यापर्यंत पोहोचणे कठीण असल्याने, त्यांनी चक्क एक क्रेन बोलावली होती. करण गायकवाड स्वतः क्रेनला लटकले आणि उंचावरून अजित पवारांच्या गळ्यात हार घातला. एवढेच नाही तर त्यांनी सामाजिक समतेचे प्रतीक असलेली महात्मा फुले पगडी देखील अजित पवारांना परिधान केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, कार्यकर्त्यांच्या या क्रेझची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

हेही वाचा – PMC Election 2026 : पुणेकरांसाठी अजितदादांचं ‘हमीपत्र’, मेट्रोसह बसप्रवास मोफत; विद्यार्थ्यांना डेटा प्लॅनसह फ्री ‘टॅब’

वाढती लोकप्रियता आणि भाजपसमोर आव्हान
पुण्यातील या रोडशोच्या माध्यमातून अजित पवारांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले आहे. सकाळपासून सुरू झालेली ही रॅली रात्रीपर्यंत सुरू राहणार असून, यामध्ये तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, अजित पवारांची ही वाढती लोकप्रियता आणि कार्यकर्त्यांचा जोश येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो. ज्या प्रभागांमधून हा रोडशो गेला, तिथे भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात थेट आणि चुरशीचा सामना होण्याची चिन्हे आहेत.

अजित पवार सध्या पुण्यात पूर्णपणे ‘ॲक्टिव्ह मोड’ मध्ये पाहायला मिळत आहेत. आज दिवसभरात त्यांनी 4 महत्त्वाच्या बैठका आणि सभांचे नियोजन केले आहे. सायंकाळी 7 वाजल्यानंतर पुन्हा एकदा त्यांचा भव्य रोडशो सुरू होणार आहे. कार्यकर्त्यांच्या या अशा हटके स्वागतांमुळे अजित पवारांच्या दौऱ्याची रंगत अधिकच वाढली असून, पुणे महानगरपालिकेच्या सत्तेचा पेच येणाऱ्या काळात अधिकच मनोरंजक होणार आहे.

हेही वाचा – Pune Election 2026 : पुण्यातील NCP च्या जाहीरनामा प्रकाशनावेळी अजित पवारांचा महेश लांडगेंना मिश्लिक टोला; म्हणाले, ‘तो मोठा नेता…’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number