Rupali Thombre: अजित पवारांनी नाराज रुपाली ठोंबरेंना दिली ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी

माजी आमदार आणि शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी जाहीर केलेल्या या यादीत समन्वयक, निरीक्षक, शहर पदाधिकारी, प्रमुख नियुक्त्या आणि विविध सेलप्रमुखांचा समावेश आहे.

Rupali Thombre: अजित पवारांनी नाराज रुपाली ठोंबरेंना दिली ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी

Rupali Thombre: पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्व विभागाची विस्तृत कार्यकारिणी बुधवारी घोषित करण्यात आली. माजी आमदार आणि शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी जाहीर केलेल्या या यादीत समन्वयक, निरीक्षक, शहर पदाधिकारी, प्रमुख नियुक्त्या आणि विविध सेलप्रमुखांचा समावेश आहे. पक्षातील असंतोष कमी करण्याच्या प्रयत्नातून ॲड. रूपाली पाटील ठोंबरे यांना कार्याध्यक्षपद देण्यात आल्याची चर्चा आहे. यापूर्वीच हाजी फिरोज शेख यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली होती. पुण्यातील पूर्व विभागात वडगाव शेरी, हडपसर, शिवाजीनगर आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, येथील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळपास 250 पदाधिकाऱ्यांची मोठी फळी उभी करण्यात आली आहे. 

हेही वाचा – Nitesh Rane on Tapovan Trees : 'झाडाला मिठी मारता, मग बकरीला का नाही?'; नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे नवा वाद

रूपाली ठोंबरे यांची नाराजी 

दरम्यान, नव्या रचनेत 39 उपाध्यक्ष, 22 सरचिटणीस, 17 चिटणीस आणि 20 संघटक सचिवांचा समावेश आहे. चार विधानसभांतील अनेक कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आले असले तरी उर्वरित चार मतदारसंघांची कार्यकारिणी केव्हा जाहीर होणार याबाबत उत्सुकता कायम आहे. गेल्या काही दिवसांत रूपाली ठोंबरे यांची नाराजी सार्वजनिकरित्या दिसून आली होती. प्रवक्तेपदाच्या फेरनिवडीदरम्यान त्यांना वगळण्यात आल्याने निर्माण झालेला तणाव वाढला होता. त्यामुळेच त्यांना आता महत्त्वाची जबाबदारी देत पक्षाने समेटाचा मार्ग अवलंबल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

हेही वाचा – Ajit Pawar: पर्यावरण वाचलं तरच… 'तपोवन' प्रकरणी अजित पवारांच्या भूमिकेमुळे महायुतीत वादाचा खडा

दरम्यान, राष्ट्रवादीने काही महत्त्वाच्या नियुक्त्याही जाहीर केल्या. माजी आमदार महादेव बाबर यांना प्रदेश प्रतिनिधीपद, तर विकास पासलकर यांना प्रवक्तेपद देण्यात आले आहे. तसेच राकेश कामठे यांची शहर समन्वयकपदी निवड झाली आहे. माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, बाळासाहेब कोद्रे, नारायण लोणकर आणि विजय ढेरे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. हसीना इनामदार यांना महिला विभाग, ईशान तुपे यांना युवक विभाग आणि लावण्या शिंदे यांना युवती विभागाच्या अध्यक्षपदी जबाबदारी देण्यात आली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number