Malegaon Election : माळेगावात अजितदादांची कट्टर विरोधक तावरे गटाशी युती, संतप्त निष्ठावान कार्यकर्त्यांची थेट बंडखोरी

पाच महिन्यांपूर्वी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कडवट शत्रुत्व असलेले दोन्ही गट आता एकत्र आल्याने, अनेक प्रभागांतील कार्यकर्त्यांमध्ये संताप आणि बंडखोरी सुरू झाली आहे.<br/>

Malegaon Election : माळेगावात अजितदादांची कट्टर विरोधक तावरे गटाशी युती, संतप्त निष्ठावान कार्यकर्त्यांची थेट बंडखोरी

Malegaon Election: माळेगाव नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे जुने राजकीय विरोधक रंजनकुमार तावरे अचानक एकत्र आले आहेत. मात्र, ही अनपेक्षित युती स्थानिक कार्यकर्त्यांसाठी मोठा आव्हान ठरली आहे. पाच महिन्यांपूर्वी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कडवट शत्रुत्व असलेले दोन्ही गट आता एकत्र आल्याने, अनेक प्रभागांतील कार्यकर्त्यांमध्ये संताप आणि बंडखोरी सुरू झाली आहे.

अजित पवार गटात नाराजी  

साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांनी स्थानिक नेत्यांवर विश्वास दाखवून थेट कार्यकर्त्यांवर अवलंबून विजय मिळवला होता. कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन तावरे पॅनलला पराभूत केले आणि अजित पवारांसाठी विक्रमी विजय मिळवून दिला. मात्र, आता नगरपंचायत निवडणुकीत पूर्वीचे शत्रू एकत्र येणे पाहून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. युतीमुळे काही निष्ठावान कार्यकर्त्यांचा विश्वास डगमगला असून, तिकीट वाटप आणि पदवाटपावरील असंतोष उफाळून आला आहे. काही कार्यकर्त्यांनी प्रभागांमधील उमेदवारी मागे घेण्यास साफ नकार दिला आहे. सोशल मीडियावरही याबाबत चर्चा सुरू झाली असून कार्यकर्त्यांनी “माळेगावचा कार्यकर्ता लढणार आहे, रडणारा नाही” असा संदेश दिला आहे.

हेही वाचा – BMC Election 2025: भाजपचा सर्व्हे बाहेर, ठाकरे आणि काँग्रेसच्या वॉर्डात विशेष रणनीती अखण्याची तयारी

संतप्त कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया

दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे की, “नेते पक्षनिष्ठा गुंडाळून ठेवतात, निवडणुका आल्या की आमचा विसर पडतो. मग आम्ही फक्त सतरंज्या उचलायच्या का?” उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नेत्यांकडून दबाव टाकला जात असून, काही उमेदवार तात्पुरते गावातून पलायन करण्याच्या विचारात असल्याचेही समजते.

हेही वाचा – Rana VS Thakur : 'यशोमती ठाकूर सहा महिन्यात भाजपात प्रवेश करतील, ही काळ्या दगडावरील रेष'; राणांना वार, यशोमथी ठाकूर यांनीही केला पलटवार

निवडणुकीवर संभाव्य परिणाम

अजित पवार आणि रंजनकुमार तावरे यांच्यातील युतीमुळे माळेगावमध्ये पक्षांतर्गत गटबाजी आणि बंडखोरी शिगेला पोहोचली आहे. या परिस्थितीचा नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवारांचा स्थिर बालेकिल्ला धोक्यात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number