Flight Advisory: दिल्लीसह उत्तर भारताच्या बहुतांश भागांत गुरुवारी सकाळी दाट धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे (visibility) जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा मोठा फटका विमान प्रवासाला बसला असून एअर इंडिया, स्पाइसजेट आणि इंडिगो यांसारख्या प्रमुख विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना (Travel Advisory) जारी केल्या आहेत. विमानतळावर पोहोचण्यापूर्वी प्रवाशांनी आपल्या विमानाचे वेळापत्रक आणि सद्यस्थिती (Flight Status) अधिकृत संकेतस्थळावरून तपासून घ्यावी, असे आवाहन कंपन्यांकडून करण्यात आले आहे. धुक्यामुळे विमानांच्या उड्डाणात आणि आगमनात विलंब होत असल्याने प्रवाशांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी हा खबरदारीचा उपाय घेण्यात आला आहे.
विमान कंपन्यांची खबरदारी आणि उड्डाणे रद्द
स्पाइसजेटने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून माहिती दिली आहे की, दिल्लीतील खराब हवामानाचा परिणाम सर्व उड्डाणांवर होऊ शकतो. दुसरीकडे, चंदीगडमध्ये दृश्यमानता अत्यंत कमी असल्यामुळे इंडिगोने सुरक्षेला प्राधान्य देत दिवसभरातील काही महत्त्वाची उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी प्रवासासाठी अतिरिक्त वेळ हातात ठेवूनच घराबाहेर पडावे, अशी सूचना करण्यात आली आहे. उत्तर आणि पूर्व भारतातील इतर शहरांमध्येही कमी दृश्यमानतेचा परिणाम दिसून येत असल्याने प्रवाशांच्या मदतीसाठी विमान कंपन्यांचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
Travel Advisory Due to dense fog in #Chandigarh, visibility has reduced drastically, impacting flight operations. As a precaution, some flights have been cancelled through the day to prioritise safety and help minimise extended waiting at the airport. We understand how… — IndiGo (@IndiGo6E) December 17, 2025
एअर इंडियाची ‘फॉकेअर’ (FogCare) मोहीम
प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एअर इंडियाने ‘फॉकेअर’ (FogCare) ही विशेष उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत, ज्या विमानांना उशीर होण्याची शक्यता आहे, त्या प्रवाशांना त्यांच्या मोबाईल फोनवर आगाऊ माहिती दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, धुक्यामुळे प्रवास प्रभावित झाल्यास प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता आपली उड्डाणे बदलण्याचा किंवा पूर्ण परतावा (Full Refund) मिळवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी चोवीस तास सेवा देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, पर्यायी व्यवस्थेसाठी प्रवाशांना सहकार्य केले जात आहे.
#TravelAdvisory Over the next few days, potential dense fog conditions resulting in poor visibility may impact flight operations at our primary hub in Delhi, and a few airports in northern and eastern India, with a cascading effect in some other cities across our network. To… — Air India (@airindia) December 17, 2025
हेही वाचा – Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट की वाढ? नवीन दर काय आहेत जाणून घ्या…
विमानतळ प्रशासनाकडून ‘श्रेणी III’ सूचना लागू
दिल्ली विमानतळ प्रशासनाने गुरुवारी सकाळी कमी दृश्यमानतेच्या पार्श्वभूमीवर विशेष कार्यपद्धती जाहीर केली आहे. सध्या विमान उड्डाणांचे संचलन ‘श्रेणी III’ (Category III) च्या स्थितीत असून, यामुळे वेळापत्रकात मोठे बदल होऊ शकतात. विमानतळ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा आणि एअरलाईन्स मिळून काम करत आहेत. दृश्यमानता वाढेपर्यंत प्रवाशांनी अद्ययावत माहितीसाठी संबंधित एअरलाईनच्या संपर्कात राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विषारी धुराच्या थरामुळे (Smog) गेल्या काही दिवसांपासून ही परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.
हवामान विभागाचा पुढील अंदाज
भारतीय हवामान विभागाने (IMD) येत्या काही दिवसांसाठी धुक्याचा इशारा दिला आहे. हवामान खात्यानुसार, 18, 20 आणि 23 डिसेंबर रोजी सकाळी मध्यम स्वरूपाचे धुके असेल. मात्र, 21 आणि 22 डिसेंबर रोजी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात अत्यंत दाट धुके पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमी दृश्यमानतेचा हा परिणाम केवळ दिल्लीपुरता मर्यादित नसून, संपूर्ण उत्तर भारताला याचा फटका बसणार आहे. त्यामुळे विमान प्रवाशांनी पुढील काही दिवस प्रवासाचे नियोजन करताना हवामानाचा अंदाज घेऊनच निर्णय घेणे हितकारक ठरेल.
हेही वाचा – SEBI Mutual Fund New Rules : SEBI चा मोठा निर्णय, म्युच्युअल फंडाच्या नियमात बदल, गुंतणूकदारांना किती फायदा?